Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Rapido Case Pune : बेकायदा प्रवासी वाहतूक प्रकरणी ‘रॅपिडो’विरुद्ध गुन्हा

Rapido Case Pune

आरटीओच्या तक्रारीनंतर विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – Rapido Case Pune : बेकायदा प्रवासी वाहतूक प्रकरणी रोपेन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. (रॅपिडो) कंपनीविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक प्रसाद सुरवसे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ‘रॅपिडो’ कंपनीविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३१८ (३), मोटार वाहन कायदा, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेट्रोच्या कामानिमित्त कात्रज चौकात जड वाहनांना बंदी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) ‘बाईक टॅक्सी’ला (पेट्रोल इंजिन असलेली दुचाकी) प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली नाही. ‘रॅपिडो’ कंपनीकडून प्रवासी वाहतुकीबाबतचे ॲप तयार करण्यात आले.  (Rapido Case Pune) या ॲपद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करुन प्रवासी वाहतूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पोलिसांकडे तक्रार दिली. बेकायदा प्रवासी वाहतूक करुन शासनाची फसवणूक केल्याचे मोटार वाहन निरीक्षक सुरवसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक राऊत तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×