Breking News
नोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई९३ लाखांची फसवणूक प्रकरणात पसार आरोपींना पकडलेयेरवडा जेलबाहेर फटाके उडवून आरोपीचे उदात्तीकरणफरार आरोपीसह दोघांना अटक; ३ पिस्टल जप्त

सैनिक कल्याण विभागात सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पद भरती

रोजगाराची सुवर्णसंधी 16 डिसेंबर रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

पात्र उमेदवारांनी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण ७२ पदाकारिता महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेल्या युध्द काळात किंवा युध्द नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येऊन त्यामुळे नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील फक्त एका व्यक्तीस त्यानंतरच्या पसंती क्रमाने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने 31 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

टेस्ट ट्रॅकच्या नुतनीकरणामुळे अनुज्ञप्ती चाचणीच्या कामकाजात बदल – सविस्तर बातमी 

वरील पदांपैकी 3 पदे ही अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारांमधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता, उपलब्धतेनुसार भरण्यात येतील. भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांचे मार्फत होणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. असे लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. निः, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×