Breking News
खूनाचा कट रचणारे टोळके गजाआडविशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

पुणे शहर पाेलीस दलातील भरतीचा प्रारंभ १६ फेब्रुवारीपासून

४६ हजार उमेदवारांनी केले अर्ज दाखल

marathinews24.com

पुणे – शहर पोलीस दलातील पोलीस भरती प्रक्रियेचा प्रारंभ १६ फेब्रुवारीपासून होणार आहे. पुणे पोलीस दलातील १६३३ पोलीस शिपाई, १०५ वाहनचालक, ३३ बँडमन अशा जागांसाठी एक लाख ३९ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कारागृहातील १३३ शिपायांच्या भरती प्रक्रियेत ४६ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.‘भरती प्रक्रिया शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, तसेच रामटेकडीतील राज्य पोलीस दलाच्या मैदानावर मैदानी चाचणी पार पडणार आहे. १६ फेब्रुवारीपासून शारिरिक चाचणी सुरू होणार असून, त्यानंतर लेखी परीक्षा आयोजित करण्यत आली आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे’, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी दिली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क – सविस्तर बातमी

‘मैदानी चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, भरती प्रक्रियेचे वेळापत्रक टप्याटप्याने जाहीर केले जाणार आहे. अधिकृत संकेतस्थळ, संदेशाव्दारे उमेदवारांना माहिती दिली जाणार आहे. शारिरिक चाचणीत उमेदवारांची छाती, उंची मोजण्यात येणार आहे. १०० मीटर, १६०० मीटर धावणे (महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर ), गोळाफेक अशा घटकांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रियेत गैरप्रकार होऊ नये म्हणून ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आ्हे. संपूर्ण भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची धावण्याची वेळ, चाचणीतील कामगिरी याची अचूक वेळ नोंदविता येणार आहे. भरती प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप होणा नाही, याची काळजी घेण्यात आली आहे’, असे अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी नमूद केले.

लेखी परीक्षेच्या टप्यात विशेष उपायोजना करण्यात येणार आहे. लेखी परीक्षा धेणाऱ्या अधिकाऱ्यांना मोबाइल क्रमांक वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षेच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गैरप्रकारांवर नजर ठेवण्यात येणार आहे. उमेदवाराांनी मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये. गैरप्रकार आढळून आल्यास त्वरीत मोबाइल क्रमांक – ७३९१०८२६११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×