पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीसाठीचे आरक्षण जाहीर

पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीसाठीचे आरक्षण जाहीर

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सोडत जाहीर

marathinews24.com

पुणे – जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रक्रिया पूर्ण करुन जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. चारुशीला देशमुख मोहिते, तहसीलदार जगदीश निंबाळकर, राहूल सारंग, जि. प. प्राथमिक शाळा लोणीकंदचे शिक्षक व विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

खादीच्या स्वदेशी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद – सविस्तर बातमी

पंचायत समितीनिहाय जाहीर केलेल्या आरक्षणाबाबतचा तपशील

इंदापूर पंचायत समिती-अनुसूचित जाती, जुन्नर-अनुसूचित जमाती महिला, दौंड आणि पुरंदर-नागरिकांचा मागासवर्ग, शिरुर आणि मावळ-नागरिकांचा मागासवर्ग महिला, वेल्हे, मुळशी, भोर आणि खेड- सर्वसाधारण महिला, हवेली, बारामती आणि आंबेगाव- सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण जाहीर लेले आहे. जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. हे आरक्षण सभापती पदाकरिता सोडत अडीच वर्ष कालावधीकरिता असणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×