कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने महाभोंडला; महिलांना विविध बक्षिसाचे वाटप

कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने महाभोंडला; महिलांना विविध बक्षिसाचे वाटप

वडारवाडी, भैय्यावाडी, पोलिस लाईन परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद

marathinews24.com

पुणे – शहरातील शिवाजीनगर, मॅाडेल कॉलनी परिसरातील महिलांसाठी कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने महाभोंडला, भव्य लकी ड्रा कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस रविंद्र साळेगावकर यांनी केले होते. आदिशक्ती जगदंबा माता नवरात्र उत्सव समिती वडारवाडी, वीर नेताजी तरूण मंडळ भैय्यावाडी, अखिल पोलिस लाईन मित्र मंडळ ट्रस्ट याठिकाणी झालेल्या कार्यक्रमात महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग घेऊन विविध बक्षिसे जिंकली.

खादीच्या स्वदेशी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद – सविस्तर बातमी

स्पर्धेत क्रमांक पटकवणाऱ्या महिलांना मानाची पैठणी, मिक्सर, कुकर, तवा , ज्यूसर अशा विविध बक्षिसाचे वाटप करण्यात आले. प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. धावपळीच्या जीवनात महिलांवरती असलेली संसारीक, नोकरी व कामाची जबाबदारी यामुळे महिलांना स्वतःच्या आनंदासाठी वेळ देता येत नाही. महिलांनी त्यांच्या आवडी, निवडी, छंद जोपासावेत, विविध ठिकाणी राहणाऱ्या महिला खेळाच्या माध्यमातून एकत्र आल्या, एकमेकींच्या ओळखी झाल्या आणि बक्षिस मिळवत त्या आनंदात घरी परतल्या हा सोहळा सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरतो”. असे आयोजक रविंद्र साळेगावकर यांनी सांगितले.

विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात कल्पेश मोरे, सुरज जोशी, अनिता शहाणे, वैजयंती सोळवे, हर्षनील शेळके, किरण ओरसे राजेश नायडू यांच्यासह परिसरातील हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×