Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

श्री क्षेत्र देहूत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू

श्री क्षेत्र देहूत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू

इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास व वापरास बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

marathinews24.com

पुणे – श्रीक्षेत्र देहू येथे ०३ ते ०५ मार्च कालावधीत संत तुकाराम महाराज बीज सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक व वारकरी उपस्थित राहणार असल्याने इंद्रायणी नदीचे पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३३ (१)(ड) अन्वये प्राप्त अधिकारांनुसार खालील आदेश लागू केले आहेत.

औंध – बोपोडी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आयुक्तांची भेट; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश – सविस्तर बातमी 

देहू येथील इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवरील पाणी पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई राहील.नदीचे पाणी पिण्यास वापरू नये. भाविकांनी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळांचा वापर करावा. नदीपात्रात कपडे धुणे किंवा पाणी दूषित होईल असे कोणतेही कृत्य करू नये. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १३१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

बीज सोहळ्यानिमित्त संसर्गजन्य रुग्णांना देहू हद्दीत येण्यास मनाई

श्रीक्षेत्र देहू येथे ०३ ते ०५ मार्च २०२६ या कालावधीत संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न होत आहे. या निमित्त राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक व वारकरी उपस्थित राहणार असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३३(१)(ठ) अन्वये प्राप्त अधिकारानुसार पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

यात्रा कालावधीत देहू नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर व सार्वजनिक जागेत संसर्गजन्य रोग्यांनीयेऊ नये. तसेच संबंधित क्षेत्रात कोणताही संसर्गजन्य रुग्ण आढळल्यास देहू नगरपंचायतीने तयार केलेल्या शेडमध्ये त्यांना राहणे बंधनकारक राहील.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×