Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांकडून अडीच कोटींची फसवणूक

जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने अडीच कोेटींची फसवणूक

५ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने एका निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताने व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निवृत्त सहायक पोलीस आयुक्तासह पत्नी, मुलगा यांच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुशील शंकरराव कदम, नंदा कदम, अनिकेत कदम (तिघे रा. फर्ग्युसन रस्ता, डेक्कन जिमखाना), दत्ता केदारी (रा. बोरज), बाळासाहेब वाळुंज (रा. कामशेत, ता. वडगाव मावळ, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित विलास उंद्रे (वय ३५,रा. मांजरी खुर्द) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस अधिकारी असल्याच्या बतावणीने तरुणाची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सहायक पोलीस आयुक्त पुणे ग्रामीण, तसेच पुणे शहर पोलीस दलात नियुक्तीस होते. तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. सहायक आयुक्तांंनी २०२६ मध्ये खेड तालुक्यातील बोरज येथे मोक्याच्या ठिकाणी मुंबईतील एका व्यावसायिकाची १२ एकर जमीन आहे. मुंबईतील व्यावासायिकाला जमिनीची विक्री करायची आहे, असे व्यावसायिकाला सांगितले होते. ही जमीन खरेदी केल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा हो्ईल, असे व्यावसायिकाला सहायक आयुक्तांनी सांगितले होते.
त्यानंतर सहायक आयुक्तांनी मुंबईतील व्यावसायिकाच्या नावे बँकेत खाते उघडले. तक्रारदाराकडून ५० लाख रुपये घेण्यात आले, तसेच सोलापूर येथील एका बँकेत खासगी कंपनीच्या नावे बनावट खाते उघडून आरटीजीएस सुविधेद्वारे २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून व्यावसायिकाकडून पैसे घेण्यात आले. त्यानंतर खरेदीखत करायचे असल्याचे सांगून सहायक आयुक्ताने तक्रारदार व्यावसायिकाकडून १ कोटी ३५ लाख रुपये रोख स्वरुपात घेतले.

खेडमधील जमीन मुंबईतील एका व्यावसायिकाची होती. मुंबईतील व्यावसायिक हताय असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगून व्यवहार पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर तक्रारदार व्यावसायिकाने सहायक आयुक्तांकडे पैसे परत मागितले. तेव्हा त्यांनी टाळाटाळ सुरू केली. पैसे मागितल्यानंतर त्यांना धमकावले, असे व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक आयुक्तांनी पत्नी आणि मुलाच्या खात्यात काही रक्कम जमा केल्याचे तपासात उघडकीस आले. या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×