पुण्यातील दबावाने झुकलेली महसूल यंत्रणा

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण

marathinews24.com

पुणे – राज्यातील सर्वात वेगाने वाढणार्‍या पुणे शहरातील मध्यवर्ती कोरेगाव पार्क परिसरातील १२०० कोटी रूपयांच्या जमीनीचा घोटाळा चर्चेत आला आहे. राजकीय वरदस्तामुळे महसूल विभागातील तहसीलदारापासून जमीन नोंदणी अधिकार्‍यांपर्यंत आर्थिंक दबावाखाली झुकलेल्या यंत्रणेमुळे सर्वसामान्यांचा प्रशासकीय यंत्रणेवरील विश्वास लयास चालला आहे. त्यातच थेट उपमुख्यमंत्र्याच्या मुलाच्या कंपनीचा थेट सहभाग असतानाही त्याच्याविरूद्ध पोलिसांकडूनही अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाईची भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे कोट्यावधींचा मलिदा लाटण्यासाठी हस्ते परहस्ते अनेकांनी घेतलेली भूमिका घोटाळेखोरांना फायदेशीर ठरली आहे.

चंदननगरमध्ये तरुणावर चाकूने वार करून खून – सविस्तर बातमी

पुण्यातील महत्वाच्या ठिकाणी कोट्यावधींचा भाव असलेली मुंढवा परिसरातील जमीन मिळवून देण्यासाठी आरोपी शीतल तेजवाणी हिने पुढाकार घेतला होता. तिने तब्बल २७५ जणांकडून स्वतः पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी करून घेत जमीन विक्रीचे अधिकार मिळवले. संबंधितांना काही लाख रूपये देण्याचे आमिष दाखवून तिने जमीन विक्रीसाठी ग्राहक शोधण्यासही गती दिली होती. त्याचदरम्यान अमेडिया ग्रुपची माहिती तेजवाणीला मिळाल्यानंतर तिने थेट संबंधित संचालकांची माहिती काढली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासह भागीदारीत असलेल्या अमेडिया कंपनीने मुंढव्यातील ४० एकर जमीन खरेदीसाठी होकार दिला. जमीन खरेदीसाठी अमेडिया कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील, पार्थ पवार यांच्यासह काही मोजक्या लोकांच्या चार ते पाच बैठका पार पडल्या. व्यवहार ठरल्यानंतर वेळ न दवडता शीतल तेजवाणीने जमीन विक्रीसाठी तत्परता दाखवली.

महार वतनाची असलेली जमीन विकण्यसाठी प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे आधीच चर्चेत असलेले आणि नेहमी वादग्रस्त असलेले तहसीलदार सूर्यंकांत येवले यालाही संबंधितांनी आपल्या गोटात समावून घेतले. त्यांच्यात काही कोट्यावधींचा व्यवहार ठरल्यानंतर तहसीलदार येवलेने जमिनीचा अपहार करुन बेकायदा आदेश आणि पत्र तयार करुन शासनाची फसवणूक केली. शीतल तेजवाणी आणि अमेडिया कंपनीला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तयार केली. त्याच्या आदेशानुसार हाताखालील सर्कल, तलाठीसह इतर कर्मचार्‍यांनीही साहेबांनी सांगितलेले काम इमानइतबारे पुर्ण केले. अखेर व्यवहार झाल्यानंतर जमिनीची गुरुवार पेठेतील हवेली तहसीलदार कचेरीत खरेदी झाली. मात्र, जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर शीतल तेजवाणी, दिग्विजय पाटील, पार्थ पवार यांचे बिंग फुटले. त्यानंतर याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर बोपोडीतील जमीन घोटाळ्याप्रकरणी दुसरा गुन्हा खडक पोलीस ठाण्यात दाखल आहे. तहसीलदार येवलेने संगनमत करून व्यवहार केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शासनाने येवलेला निलंबित केले.

सर्वसामान्यांना वेगळा न्याय, नामांकितांना रेडकारपेट

सर्वसामान्यांनी जमीन खरेदी-विक्री करताना संपुर्ण कागदोपत्री प्रक्रिया पुर्ण झाली आहे की नाही, मुद्रांक शुल्कसह इतर शासकीय शुल्क जमा केले आहे का, संबंधित जमिनी शासकीय नाही ना, यासह अनेक बारकावे तपासल्यानंतर जमीनींची खरेदी-विक्री करता येते. प्रत्यक्षात मात्र, उपमुख्यमंत्र्याचा मुलगा असलेल्या पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने मुंढव्यातील ४० एकर खरेदी प्रकरणात संपुर्ण नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. मुद्रांक शुल्क वाचविण्यासाठी शोधलेली पळवाट, तहसीलदार येवलेने शासनाची केलेली फसवणूक, राजकीय वरदहस्तामुळे सर्वकाही आलंबेल झाले. त्यामुळेच बिनधिक्कपणे महार वतनाची जागा खरेदी झाली.

दिग्विजय पाटील, पार्थ पवारांवर पुणे पोलीस मेहेरबान

जमीन खरेदी प्रकरणात अमेडिया कंपनीचे पार्थ पवार यांचा थेट संबंध आहे. असे असतानाही मात्र पुणे पोलिसांच्या आर्थिंक गुन्हे शाखेने अजूनही त्यांना जबाब घेण्यासाठी बोलावण्याची हिंम्मत दाखवली नाही. दुसरीकडे दिग्विजय पाटील काही मिनीटांसाठी एका वरिष्ठ अधिकार्‍याला भेटून जबाब देउन गेल्याचे भासविण्यात आले. त्यामुळे हायप्रोफाइल गुन्ह्यात आरोपींनाही रेड कारपेट मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. किरकोळ स्वरूपातील गुन्ह्यातही हस्ते परहस्ते मदत करणार्‍यांना पोलीस आरोपी बनवून त्यांना अटक करतात. मात्र, पुण्यातील मुुंढवा जमीन खरेदी घोटाळ्यातील अमेडिया कंपनीचे संचालक पार्थ पवार यांच्यावर पुणे पोलीस मेहेरबान का आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×