Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात रिक्षांची चोरी; व्यवसायही थाटला

सराईत चोरट्याला बेड्या, ६ रिक्षा जप्त

marathinews24.com

पुणे – सराईत चोरट्याने लढवलेल्या शक्कलमुळे पोलिसही अवाक झाले आहे. रिक्षांची चोरी केल्यानंतर सराईताने स्क्रॉपमधील रिक्षांचे क्रमांक लावून त्याद्वारे प्रवाशांची ने-आण करीत धंदाही केली. संबंधित सराईत चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १० लाख ७८ हजारांच्या चोरीच्या ६ रिक्षा जप्त केल्या आहेत. शादाब युसुफ अन्सारी (वय २५, रा. महंमदवाडी रोड, हडपसर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून वानवडी, काळेपडळ, चंदननगर, संत तुकारामनगर पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले.

पिस्तुल बाळगणार्‍या तिघांवर गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

काळेपडळ पोलीस हद्दीत गस्त घालत असताना पोलिस अंमलदार महादेव शिंदे यांना रिक्षा चोरट्यांची माहिती मिळाली. उंड्री परिसरात चोरी झालेली रिक्षा झाडीखाली उभी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने याठिकाणी सापळा रचून शादाबला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. सखोल तपास केल्यानंतर त्याने आणखी सहा रिक्षा चोरी केल्याचे सांगितले. त्याने रिक्षा चोरीनंतर त्याला स्क्रॉपमधील रिक्षांचे क्रमांक लावून त्याद्वारे विविध भागात रिक्षा चालक म्हणून व्यवसाय केला. ही कारवाई उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमित शेटे, प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, महादेव शिंदे तसेच लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, गिरीराज जगदाळे यांनी आहे.

भंगार दुकानात किलोवर आणल्या नंबर प्लेट

सराईत शादाबने भंगार दुकान विक्री दुकानामध्ये जाऊन तेथून किलोवर जुन्या रिक्षांच्या तसेच स्क्रॉपमध्ये विक्री केलेल्या रिक्षांच्या नंबर फ्लेट आणल्या. त्यानंबर प्लेट आणून त्या पुन्हा रंगरंगोटी करून चोरी केलेल्या रिक्षांना लावल्या. नंतर त्या रिक्षा घेऊन आरोपी फिरत होता. दरम्यान, १५ दिवस रिक्षा घेऊन फिरल्यानंतर तो कुठेही रिक्षा सोडत होता. त्याचे एक चाक काढून घेऊन जात. पुन्हा काही दिवसांनी येऊन तो रिक्षा घेऊन जात होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×