Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Road Accident Pune : वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

Pune Road Accident News

अपघातानंतर पसार झालेल्या चालकाचा शोध सुरू

marathinews24.com

पुणे – Road Accident Pune : भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लताबाई दत्तात्रय रासकर (वय ६२) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याबाबत अनिकेत संपत चौरे (वय ३४, रा. साधना सोसायटी, माळवाडी, हडपसर) यांनी याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशोत्सवात पुण्यातील भाविकांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना हरयाणात पकडले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत चौरे यांची आजेसासू लताबाई रासकर या ४ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्ता ओलांडत होत्या. लोणी काळभोर परिसरात भरधाव चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. गंभीर जखमी झालेल्या रासकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्या मरण पावल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक माळी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×