पसार आरोपी जेरबंद
marathinews24.com
पुणे – सराफी पेढीत शस्त्राच्या धाकाने लूट… चंदननगर भागातील सराफी पेढीत शिरून शस्त्राच्या धाकाने दागिने लुठणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली. चोरट्यांबरोबर असलेला एक साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. सनी राजू खांडेकर (वय २४), अनिल परशुराम विसरे (वय २८, दोघे रा. इंदिरानगर, गुलटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंदननगर भागातील साईनाथनगर परिसरात सरााफी पेढी आहे. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास सराफी पेढीत शिरून खांडेकर, विसरे आणि साथीदाराने सराफी पेढीच्या मालकाला कोयत्याचा धाक दाखवून सोन्याच्या बाळ्या चोरल्या होत्या.
राखी पौर्णिमेला भावाला जिवे मारण्याची धमकी; विवाहितेची आत्महत्या – सविस्तर बातमी
चंदननगर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात झाले. उद्घाटन सोहळ्यानंतर चंदननगर भागातील सराफी पेढीत लूटमारीची धटना घडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा गु्न्हे शाखेच्या युनिट चारकडून समांतर तपास करण्यात येत होता. तांत्रिक तपासात आराेपी खांडेकर, विसरे हे गुलटेकडीतील इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यत घेतले. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अमर कदम, वैभव मगदूम, पाेलीस कर्मचारी एकनाथ जोशी, संजय आढारी, नागेशसिंग कुंवर, विनोद महाजन, अमजद शेख, तुषार खराडे, किशोर दुशिंग यांनी ही कामगिरी केली.





















