खोलीमालकाच्या निष्काळजीपणामुळे बाप-लेकाचा मृत्यू, गुन्हा दाखल, वारजे माळवाडीतील गॅसस्फोट प्रकरण
Marathinews24.com
नितीन नारायण बराटे वय ४२, रा. हर्षवर्धन इमारत, वारजे गावठाण असे गुन्हा दाखल झालेल्या खोली मालकाचे नाव आहे. मोहन माणिक मुडावत (वय ४३), पप्पु मोहन मुडावत (वय २३ दोघे सध्या रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडीतील गोकुळनगर भागात पत्र्याच्या खोलीत मोहन आणि पप्पू राहायला होते. ९ एपिलला मध्यरात्री सिलिंडरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाला. स्फोटात गंभीररित्या जखमी झाल्यामुळे मुडावत बाप-लेकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, शॉर्टसर्किट झाल्यानंतर घरात आग लागली. त्यावेळी मोहन आणि पप्पू गाढ झोपेत होते. आग लागल्यानंतर दोघेही झोपेतून जागे झाले. त्यानंतर ते घरातील मोरीत लपले होते. मात्र, त्याचवेळी खोलीतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरला आग लागून स्फोट झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
खोलीत नव्हेत व्हेंटीलेशन, विद्युत प्रवाह संपुर्ण खोलीला
मुडावत राहत असलेल्या खोलीला व्हेंटीलेशन नसल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तसेच एकच दरवाजा असल्यामुळे शॉर्टसर्किट संपुर्ण पत्र्याच्या खोलीला झाले. पत्र्यालाच करंट असल्याुमळे मुडावत बाप-लेकाला दरवाजा उघडता आला नाही. त्यानंतर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होउन दोघांचा मृत्यू झाला. बाप-लेकाच्या मृत्यूला खोली मालक जबाबदार असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.