Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

नाशिकमध्ये चिमुकलीवरील अत्याचारानंतर हत्येच्या घटनेचे दुःख – डॉ. नीलम गोऱ्हे

नाशिकमध्ये चिमुकलीवरील अत्याचारानंतर हत्येच्या घटनेचे दुःख - डॉ. नीलम गोऱ्हे

आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी

marathinews24.com

मुंबई – नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या प्रकरणावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. २४ वर्षीय आरोपी विजय संजय खेरनार याने अत्याचारानंतर मुलीची हत्या केली व फरार झाला होता. पोलिसांनी तत्काळ शोध घेत त्याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

हुक्का पार्लरवर छापा, तिघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “अशा नराधम प्रवृत्तीच्या व्यक्तींना कायद्याची आणि समाजाची भीती राहिली नाही. अनेक कायदे असूनही दोषसिद्धीचे प्रमाण केवळ २४ टक्के आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. गुन्हा झाल्यानंतर आरोपीला शिक्षा निश्चित मिळाली पाहिजे, तेव्हाच समाजात संदेश जाईल की अशा विकृतीला जागा नाही. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी स्पष्ट मागणी आहे आणि त्या दिशेने मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.”

अत्याचार पीडित मुलींच्या कुटुंबीयांना सुरक्षित वातावरण देण्यावर भर देत सांगितले की, “अत्याचाराची तक्रार पालकांनी ताबडतोब केली पाहिजे. पोलिसांनीही नवीन भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करताना आवश्यक माहिती देणे बंधनकारक असल्याने त्वरित कार्यवाही झाली पाहिजे. साक्षीदार संरक्षण कायद्याचा प्रभावी वापर झाला तर आरोपी दोषी सिद्ध होण्याची शक्यता वाढू शकते.”

डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणातही अत्यंत कठोर भूमिकेतून न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून आरोपीला तत्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी दोषसिद्धीचे प्रमाण आणि तपास प्रक्रिया मजबूत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×