Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

रस्ता सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांना वाहतूक नियमांची शपथ

रस्ता सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांना वाहतूक नियमांची शपथ

‘सेफ पुणे रोड मूव्हमेंट’अंतर्गत नांदेड सिटी, विश्रांतवाडी परिसरात जनजागृती

marathinews24.com

पुणे – शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याबरोबरच नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यावर वाहतूक पोलिसांनी भर दिला आहे. त्याअंतर्गत पुणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने शनिवारी (दि. १२) नांदेड सिटी आणि येरवडा वाहतूक विभागाच्या हद्दीत ‘सेफ पुणे रोड मूव्हमेंट’ अंतर्गत रस्ता सुरक्षा व वाहतूक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. नांदेड सिटी वाहतूक विभागाच्या हद्दीत सहायक पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेचे यशवंत विद्यालय, खडकवासला (आर.एस.) नांदेड सिटी पब्लिक स्कूल, विद्या प्रतिष्ठान पवार स्कूल, नांदेड सिटी तसेच खडकवासला प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोन येथे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली.

भगवान वराह जयंतीनिमित्त पुण्यात भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न – सविस्तर बातमी 

रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी, हेल्मेटचा वापर, सिग्नलचे पालन आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली साठे बिस्किट चौक, विश्रांतवाडी येथे शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. पुणे शहरातील प्राणांतिक अपघातांमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. हेल्मेट वापरा, झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा, सिग्नलचे पालन करा, वेगावर नियंत्रण ठेवा आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नका, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले.

अपघात घडल्यास जखमींना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असेही सांगण्यात आले. ‘वाहतूक नियमांचे पालन करा, स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवा. सुरक्षित रस्ता, सुरक्षित प्रवास आणि अपघातमुक्त पुण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ‘सेफ पुणे रोड मूव्हमेंट’मध्ये सहभागी व्हावे,’ असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेने केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×