Breking News
वै. हरिभक्त परायण सखाराम महाराज तडस निर्व्यसनी ग्रुप तर्फे आषाढी एकादशीनिमित्त घाटी रुग्णालय व अनाथ आश्रमात फराळ वाटपसस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १०२ पिशव्यांचे संकलनदिवसा रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीचा एलसीबीने केला पर्दाफाशमाहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीच्या आमिषाने फसवणूकपुण्यात अल्पवयीनावर गाेळीबार करणारा गुंड अटकेतपुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खूनशहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूगुंतवणुकदारांची ८८ कोंटींची फसवणूक; पसार झालेल्या आरोपीचे प्रत्यार्पणआरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६ निमित्त २६ जुलै रोजी पुणे–जेजुरी–बारामती मार्गावरील वाहतुकीत बदलपुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

साहित्य रंग’ भाग – २२ प्रेक्षकांच्या भेटीला

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेवर दर्जेदार साहित्यिक पर्व

marathinews24.com

मुंबई – साहित्य, कविता आणि विचारांची मेजवानी देणारे ‘साहित्य रंग’ या डिजीटल व्यासपीठाचा २२ वा भाग ०५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम मिती ग्रुप डीजिटलच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित होणार आहे.मिती ग्रुप आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष पुढाकारातून उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

गणेश विसर्जनानंतर अर्धवट मुर्तींचे छायाचित्रणासह प्रसारणास बंदी – सविस्तर बातमी

साहित्यप्रेमींसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. या भागात कवयित्री अंजली कुलकर्णी, कथालेखिका सुचिता घोरपडे आपले लेख, साहित्यिक विचार, कविता आणि रचना सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने या करणार असून, नेहमीप्रमाणे रसिकांशी संवाद साधणारी ही मालिका साहित्य प्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे. मराठी स्त्रीवादी कवयित्री अंजली कुलकर्णी या अनुभवी कवयित्री असून त्यांची २३ पुस्तके प्रकाशित आहेत व त्यांच्या कवितासंग्रहांना राज्य सरकार, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि विविध साहित्य संस्थांचे अनेक नामांकित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या कवितांचे अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले असून त्यांच्या कवितांचा समावेश शालेय व विद्यापीठीय अभ्यासक्रमातही लेला आहे.

कथालेखिका सुचिता घोरपडे यांचा ‘खुरपं’ हा कथासंग्रह मुंबई विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट असून त्यांनी कथा, लेख व बालसाहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. विविध साहित्य संमेलने, दिवाळी अंक व मासिकांतून त्यांचे लेखन प्रकाशित झाले असून त्यांना नुक्कड साहित्य संमेलन आणि इतर संस्थांचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत..‘साहित्य रंग’ ही मालिका डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या साहित्यिक जाणिवेचा आणि नव्या लेखक-कवींसाठी उभारलेल्या व्यासपीठाचा उत्तम नमुना आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×