Breking News
शेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हेआदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान१४ वर्षांनंतर शिक्षक पुरस्काराची परंपरा पुन्हा सुरू; ४२ शिक्षकांचा सन्मानउधारीवर किराणा माल न दिल्याने महिलेला मारहाणमहापालिका वसाहतीतील घरातून दागिने चोरीपीएमपीचा बनावट पास तयार करुन फसवणूक

Sangli Accident : रेणावी घाट अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची मदत

Sangli Accident

जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही शासन करणार

marathinews24.com

सांगली – विटा-जत मार्गावरील रेणावी घाटात दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. उपचारादरम्यान १७ वर्षीय साक्षी चंद्रकांत पवार या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य शासनाकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही शासन करणार असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली.

पुण्यात वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला पोलीस आयुक्तांकडून ब्रेक – सविस्तर बातमी 

विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी रेणावी घाट परिसरात हा अपघात झाला. विटा आगाराची विटा-भिवघाट बस आणि मेढा आगाराची विजापूर-मेढा बस यांच्यात जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत खानापूर येथील नंदा हरिदास त्र्यंबके (६०) आणि बांबवडे येथील धोंडिराम लक्ष्मण पाटील (७८) यांचा जागीच मृत्यू झाला होता.

या अपघातात तब्बल ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ऐनवाडी येथील साक्षी पवार हिची प्रकृती शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान खालावली. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही तिचा मृत्यू झाला. साक्षी ही बळवंत महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती.

गंभीर जखमी असलेल्या सात प्रवाशांना पुढील उपचारासाठी सांगली, कऱ्हाड आणि कोल्हापूर येथील रुग्णालयांत हलविण्यात आले आहे. तर १५ जखमींवर विटा येथे उपचार सुरू असून, त्यापैकी नऊ जणांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जखमींच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत करण्याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी तसेच जखमींचा उपचाराचा खर्च शासनाने करावा, यासाठी आमदार सुहास बाबर यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये मदत देण्याची घोषणा केल्याची माहिती देण्यात आली आहे.

या मदतीमुळे अपघातात आपल्या व्यक्तींना गमावलेल्या कुटुंबीयांना काही प्रमाणात आधार मिळणार असला, तरी रेणावी घाटातील या दुर्घटनेने एसटी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×