Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

बोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार 

उपमहापौर परशुराम वाडेकर

marathinews24.com

पुणे – बोपोडी परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कामांना गती मिळावी आणि बोपोडीचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी बोपोडी येथील रेडीरेकनरचा दर वाढविण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे.

पुण्यात विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा निषेध – सविस्तर बातमी

यासंदर्भात पुण्याचे उपमहापौर मा. परशुराम वाडेकर हे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

आज दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांनी मा. सतीश कुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), मा. अर्चना पाटील, उपजिल्हाधिकारी तसेच मा. ऋषिकेश घाटे, सहाय्यक अधिकारी यांच्यासमवेत बोपोडी परिसरातील सर्व्हे नं. २३ व २४, नाईक चाळ, भोईटे चाळ, इंदिरा वसाहत, आदर्श नगर तसेच सर्व्हे नं. ५३ व ५४, बोपोडी, मुंबई-पुणे रोड या भागांची पाहणी केली.

यावेळी बोलताना मा. परशुराम वाडेकर यांनी सांगितले की, बोपोडी परिसरातील सुमारे ७० टक्के भाग झोपडपट्टी क्षेत्रात येतो. या परिसरातील रेडीरेकनरचा दर तुलनेने कमी असल्यामुळे विकासकांना येथे SRA योजनेच्या माध्यमातून पुनर्वसन प्रकल्प राबविण्यास अपेक्षित आर्थिक व्यवहार्यता मिळत नाही. परिणामी अनेक विकासक बोपोडी परिसरात SRA योजना राबविण्यास उत्सुक नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
बोपोडी परिसरातील नागरिकांना चांगली घरे, मूलभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकास मिळण्यासाठी रेडीरेकनरच्या दरात योग्य ती वाढ करणे अत्यंत आवश्यक आहे. रेडीरेकनरचा दर वाढल्यास SRA प्रकल्पांसाठी विकासकांना प्रोत्साहन मिळेल आणि रखडलेल्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी बोपोडीतील रेडीरेकनरचा दर वाढविणे हा महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो, असेही मा. वाडेकर यांनी सांगितले.

यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बोपोडी परिसरातील रेडीरेकनरचा दर वाढविण्याची मागणी ठोसपणे मांडण्यात येणार असल्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी स्पष्ट केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×