Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

पुण्यात विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा निषेध

राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटनेकडून नाराजी

marathinews24.com

पुणे – ध्वनी प्रदुषणाच्या विरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावर एकाने मारहाण केल्याची घटना घडली. त्यापार्श्वभूमीवर पुणेकरांसह राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटनांनी त्यांच्या मारहाणीचा निषेध व्यक्त केला आहे. त्यासोबचत सोशल मीडियावरही नेटीझन्सने आपला राग व्यक्त करीत कमेंट्सचा पाउस पाडला आहे. विचारांचा विरोध विचारांनीच व्हायला हवा, अशी भूमिका अनेकांनी घेतली.

दहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार ‘दशावतार’ – सविस्तर बातमी

सण-उत्सवात डीजे वादनामुळे होणार्‍या त्रासाला कंटाळून नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागात राहणारे ३७ वर्षीय विद्यानंद बापट यांनी डीजे मुक्ती चळवळीचा पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मोहिमेला अनेकांनी पाठिंबा दर्शविला असून, डीजे वादनाला विरोध केला जात आहे. मात्र, दुसरीकडे काही गणेश मंडळातील कार्यकर्त्यांकडून डीजे वादनाचा आग्रह कायम केला जात होता. त्याविरुद्ध बापट यांच्याकडून भूमिका मांडली जात होती. गुरुवारी टिळक रोडवर वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसोबत बोलताना एकाने त्यांना मारहाण केली. त्यामुळे घटनेच्या निषेधार्थ अनेकजण एकवटले असून, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्यावतीने पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणार्‍याला कठोर शिक्षा देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

कोट- डीजेच्या विरोधात आग्रही भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना काही व्यक्तींनी केलेल्या मारहाणीची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. एखाद्याचे मत मान्य नसले, तरी त्या मताचा आणि ते मांडण्याच्या अधिकाराचा आदर व्हायला हवा. मात्र, अलीकडच्या काळात विरोधी मत मांडणार्‍यांचा आवाज दडपण्यासाठी मारहाण करणे, दांडगाई करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करणे, ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. बदलत्या काळाशी सुसंगत राहून, आपल्या संस्कृतीचे भान जपत हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा व्हावा. गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणणारा, आनंद देणारा आणि उत्साह वाढविणारा असावा, हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. – सुप्रिया सुळे, खासदार

पुण्यात डीजे विरोधात आवाज उठवणार्‍या विद्यानंद बापट यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे. बापट यांनी आपली भूमिका मांडताना कधीही कुणालाही अपशब्द वापरले नाही. कुठलाही आक्रस्ताळेपणा दाखवला नाही. कदाचित त्यांनी मांडलेला एखादा मुद्दा कुणाला पटला नसेल तर बापटांच्या मुद्द्याचा बौद्धिक प्रतिवाद करता येऊ शकतो. मात्र अशा पद्धतीने हिंसक हल्ला करणे हे पुणेकर म्हणून अशोभनीय आहे. दोषींवर तात्काळ कारवाई व्हायला हवी आणि विद्यानंद बापट यांना सुरक्षा सुद्धा द्यायला हवी.

सुषमा अंधारे, उपनेत्या, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×