Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

संजय दराडे पुण्याचे नवे सह पोलिस आयुक्त

'प्रगती' उपक्रमाद्वारे सायबर गुन्ह्याना आडकाठी

पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल

marathinews24.com

पुणे – राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून, पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्या जाहीर केल्या आहेत. पुणे शहराच्या पोलीस सह पोलिस आयुक्तपदी संजय दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर गुन्हे शाखेच्या अपर पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे.

शिवसेना नेत्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांची आनंदाश्रम व शक्तीस्थळाला भेट; धर्मवीर आनंदजी दिघे यांना अभिवादन – सविस्तर बातमी

पुण्यात बदलून आलेले अधिकारी

संजय दराडे (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र येथून पुणे शहर पोलीस सह आयुक्तपदी), तेजस्वी सातपुते (समादेशक, एसआरपीएफ गट १, पुणे येथून पदोन्नतीने पुणे शहर अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पदी), एस. व्ही. पाठक (अपर पोलीस आयुक्त, ठाणे येथून विशेष पोलीस महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे, सीआयडी, पुणे पदी), प्रशांत अमृतकर (समादेशक, एसआरपीएफ गट १६, कोल्हापूर येथून पुणे शहर पोलीस उप आयुक्तपदी), गौहर हसन (पोलीस उप आयुक्त, सोलापूर येथून पुणे शहर पोलीस उप आयुक्तपदी), जीवन बेनवाल (सहायक पोलीस अधीक्षक, जितूर, परभणी येथून पुणे शहर पोलीस उप आयुक्तपदी), पी. आर. पाटील (पोलीस अधीक्षक, सीआयडी, पुणे येथून पुणे शहर पोलीस उप आयुक्तपदी), शुभम कुमार (सहायक पोलीस अधीक्षक, अचलपूर, अमरावती येथून अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पदी), संजय पाटील (पोलीस उप आयुक्त, नवी मुंबई येथून पोलीस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड पदी), धिरज पाटील (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सांगली येथून पोलीस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड पदी), शफकत आमना (अपर पोलीस अधीक्षक, धाराशिव येथून पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग – सीआयडी, पुणे पदी),

पुण्यातून बाहेर बदली झालेले अधिकारी

रंजन शर्मा (पुणे शहर पोलीस सह आयुक्त पदावरून विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्रपदी), लोहित मतानी (पुणे शहर पोलीस उप आयुक्त पदावरून पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, नागपूर पदी), शिवाजी पवार (पोलीस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड येथून पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई पदी), रमेश नागनाथ चोपडे (अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण येथून उप आयुक्त, सागरी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग पदी), विक्रम देशमुख (पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, पुणे येथून पोलीस उप आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विराप पदी), हिम्मत जाधव (पुणे शहर येथून पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई पदी), जयंत मीना (अधीक्षक एटीएस पुणे येथून बृहन मुंबई )

पुण्यातील अंतर्गत बदल आणि पदोन्नती

एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, सीआयडी, पुणे येथून पदोन्नतीने पोलीस उप महानिरीक्षक – सीआयडी, पुणे पदी), विशाल गायकवाड (पोलीस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड येथून अपर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे पदी), रोहिदास पवार (अपर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे येथून पोलीस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड पदी), पल्लवी बर्गे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथून पोलीस अधीक्षक, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, पुणे पदी ), संभाजी कदम (पोलीस उप आयुक्त, पुणे शहर येथून पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे पदी) आगामी काळातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×