Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

नीटच्या उत्तरपत्रिकेत घोटाळा?

नीटच्या उत्तरपत्रिकेत घोटाळा?

खादार सुप्रिया सुळे यांची ट्विटद्वारे चौकशीची मागणी

marathinews24.com

पिंपरी – नीट २०२५ झालेल्या परिक्षेत देहूरोड येथील एका विद्यार्थीनीच्या ओएमआर शीटमध्ये खाडाखोड, बनावट सही अशा अनेक त्रुटी आहेत. या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत झालेल्या या फेरबदलामुळे विद्यार्थिनीचे पालक व विद्यार्थिनी अतिशय चिंताग्रस्त आहेत. नीटमधील या घोटाळ्याची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून त्यांनी ट्विटद्वारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.

‘फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई – सविस्तर बातमी 

देहूरोड येथील मुस्कान वसीम शेख या विद्यार्थिनीने नीट २०२५ परीक्षा दिलेली होती. राष्ट्रीय चाचणी एजन्सीद्वारे (एनटीए) घेण्यात आलेली ही परीक्षा तिच्या वैद्यकीय कारकिर्दीसाठी महत्त्वाची आहे. तिने त्यासाठी दोन वर्षे कठोर तयारी केली आहे. ४ जून २०२५ रोजी एनटीएने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ओएमआर शीट आणि उत्तरपत्रिका जारी केल्या. त्यानंतर मुस्कान शेख या विद्यार्थिनीने ओळखपत्रांचा वापर करून ओएमआर शीट तपासण्यासाठी लॉग इन केले. तेव्हा असे आढळून आले की, दाखवलेली ओएमआर शीट तिची नव्हती. हे पाहून या विद्यार्थिनीला धक्का बसला. कारण त्या ओएमआर शीटमध्ये खाडाखोड, बनावट सही अशा अनेक त्रुटी आहेत .

नीटसाठी मुस्कानचा हा दुसरा प्रयत्न होता. तिने वर्षभर दररोज १४-१४ तास अभ्यास व सराव केलेला आहे. तिला रँकमध्ये येण्याचा आत्मविश्वास आहे. परंतु परीक्षेच्या उत्तरपत्रिकेमध्ये झालेल्या या फेरबदलामुळे विद्यार्थिनीचे पालक व विद्यार्थिनी अतिशय चिंताग्रस्त आहेत. या विद्यार्थिनीच्या गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या दोन्ही ओएमआर शीट्समध्ये कमालीच्या विसंगती स्पष्टपणे दिसत आहेत. या विद्यार्थिनीने या समस्येबद्दल एनटीएला ईमेल केला आणि दररोज पाठपुरावा करत आहे. परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

तसेच त्यांच्या हेल्पलाइनवर (०११६९२२७७००) ही विद्यार्थीनी नियमितपणे कॉल करत आहे. सुरुवातीला त्यांना सांगण्यात आले होते की दोन दिवसांत उत्तर दिले जाईल,.परंतु अजूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मुलीच्या पालकांनी अपना वतन संघटनेशी संपर्क साधला. तसेच निटच्या पेपर संदर्भात तक्रार केल्यांनतर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे मुस्कान शेख हिने रावेत पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिकभाई शेख यांनी तात्काळ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय जे. पी. नड्डा यांना मेलद्वारे या गंभीर प्रकारची माहिती दिली.

मुस्कान शेख या विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्यासाठी अपना वतन संघटनेचे कार्यकर्ते सर्व स्तरावर पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभेच्या खासदार फौजिया खान, मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना भेटून मुस्कानला मदत करण्याची विंनती करण्यात आली.

नीटमधील या घोटाळ्याची गंभीर दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली. त्यांनी ट्विटद्वारे एनटीए व केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. तसेच नीटसारख्या केंद्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये असे प्रकार होत असतील तर प्रशासनाच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. तसेच राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांनीही ट्विटद्वारे या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे .

या आहेत त्रुटी

१) शीटवरील विद्यार्थिनीच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे असून व हस्ताक्षर दुसऱ्याचे आहे.

२) विद्यार्थिनीच्या आईचे नाव “नसीम शेख” असताना शीटवर “असिफा शेख” लिहलेले आहे.

३) रोल नंबर खाडाखोड करून बदललेले दिसत आहे.

४) स्वाक्षरी बनावट किंवा कॉपी केलेली दिसते.

५) शीटवरील बोटाचा ठसा जुळत नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×