Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

शाळेच्या लिपीकाकडून ३७ लाखांची अफरातफर

शाळेच्या लिपीकाकडून ३७ लाखांची अफरातफर

पत्नीच्या खात्यात वळवली रक्कम

marathinews24.com

पुणे – लिपिकाने शाळेची तब्बल ३७ लाख रुपयांची अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड सिटी येथील विद्या प्रतिष्ठानच्या पवार पब्लिक स्कूलमध्ये उघडकीस आला आहे. इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ही रक्कम आरोपीने स्वतःच्या पत्नीच्या खात्यात वळविल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी शाळेच्या प्राचार्या वंदना सचिन जोशी (वय ५५, रा. चंद्रगंगा सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेंद्र अनपट व त्याची पत्नी अश्विनी अनपट उर्फ अश्विनी तरटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ नोव्हेंबर २०२४ ते ३ जून २०२५ या कालावधीत घडल्याचे निष्पन्न झाले आहे.

जादा दराच्या वादातून रॅपिडो चालकावर हल्ला – सविस्तर बातमी 

मिळालेल्या माहितीनुसार, विद्या प्रतिष्ठान ही नामांकित शैक्षणिक संस्था असून तिचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत. या संस्थेअंतर्गत येणाऱ्या पवार पब्लिक स्कूलमध्ये आरोपी राजेंद्र अनपट हा क्लर्क म्हणून कार्यरत होता. राजेंद्र अनपटने पदाचा गैरफायदा घेत शाळेच्या खात्यातून परवानगीशिवाय इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे काढून ते पत्नीच्या खात्यात वर्ग केल्याचा आरोप आहे. तसेच ही अफरातफर लपविण्यासाठी संस्थेच्या नोंदींमध्ये बनावट कागदपत्रे तयार केल्याचेही तपासात उघड झाले आहे. दरम्यान, संस्थेच्या लेखा परीक्षणादरम्यान (ऑडिट) ही आर्थिक गैरव्यवहाराची बाब उघडकीस आली. तपासात एकूण ३६ लाख ९९ हजार ९८८ रुपयांची अफरातफर झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×