Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

शालेय विद्यार्थ्यांनी केले पाटीपूजन

शालेय विद्यार्थ्यांनी केले पाटीपूजन

शनिवार पेठेतील न्या. रानडे बालक मंदिराच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन

marathinews24.com

पुणे – विजयादशमी अर्थात दसऱ्याचे औचित्य साधून साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषेत सहभागी होत पाटीपूजन केले. शनिवार पेठेतील न्या. रानडे बालक मंदिराच्या सभागृहात आज (दि. 1) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा १२ ऑक्टोबर रोजी पुण्यात – सविस्तर बातमी 

साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दसऱ्याला पाटी-पुस्तकांचे पूजन हे ज्ञान, सरस्वती देवी आणि शिक्षणाची देवता यांचे स्मरण करण्यासाठी केले जाते. कारण हा दिवस शारदीय नवरात्रीचा एक भाग असून महासरस्वतीची उपासना केली जाते. पूजनासाठी आठ फुटी सरस्वती पाटीची रांगोळी रेखाटण्यात आली होती. त्या भोवती बसून विद्यार्थ्यांनी सामूहिक पूजा केली. राष्ट्रीय कला अकॅडमीचे अमर लांडे, रोमा लांडे यांनी रांगोळी रेखाटली होती.

पाटी पूजन अर्थात सरस्वती पूजनाद्वारे आपली संस्कृती, परंपरा जपत उत्तम आचार-विचारांचे सोने विद्यार्थांनी लुटावे, देवी सरस्वतीची कृपा असावी या करिता विद्या आणि कलेची देवता सरस्वती मातेस वंदन करावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे मंडळाचे अध्यक्ष पियूष शहा यांनी प्रास्ताविकात सांगितले.

गंधाली शाह, वज्रलेपनकार स्वाती ओतारी, अभिषेक मारणे, सतीश नाहर, न्या. रानडे बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका अमिता दाते तसेच शिक्षिका शिल्पा पराडकर, मेघा रोंघे, रूपाली शुक्ल, सायली फाटक, सुवर्णा ढवळे उपस्थित होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×