Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

शाळकरी मुलाला धमकावून अत्याचार

शाळकरी मुलाला धमकावून अत्याचार

बाणेर पोलिसांकडून अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – शाळेतून घरी निघालेल्या एका १३ वर्षीय मुलाला अडवून त्याच्या ओळखीतील एका अल्पवयीनाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका १७ वर्षीय अल्पवयीन युवकाविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत मुलाच्या आईने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुुरस्तीसाठी दिलेली मोटार घेऊन गॅरेज चालक पसार – सविस्तर बातमी 

अल्पवयीनाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १३ वर्षीय मुलगा ११ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास शाळेतून घरी निघाला होता. त्यावेळी आरोपी अल्पवयीनाने त्याला अडविले. खेळायला जाऊ अशी बतावणी केली. त्यानंतर मुलाला शाळेच्या परिसरात एका झाडाजवळ नेऊन त्याला पैसे देण्याचे आमिष दाखविले. मुलावर त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलाने त्याला विरोध केल्यानंतर त्याला मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक सानप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×