Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

द्वितीय आंतरराष्ट्रिय खरेदीदार-विक्रेता परिषद पुण्यात उत्साहात संपन्न

महाराष्ट्रातील सूक्ष्म व लघु उद्योगांना जागतिक बाजारपेठेकडे नेणारी परिषद ठरेल प्रभावी माध्यम

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आणि इंडिया एस एम इ फोरम (सूक्ष्म उद्योग मंच )यांच्या संयुक्त विद्यमाने, केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ‘रॅम्प’ (सूक्ष्म उद्योग कार्यक्षमता वृद्धी व गती योजना) या उपक्रमांतर्गत राज्यातील द्वितीय आंतरराष्ट्रिय खरेदीदार-विक्रेता परिषद मोठ्या उत्साहात पार पडली.

राष्ट्रीय लोकअदालतीचे १३ डिसेंबर रोजी आयोजन – सविस्तर बातमी

सदर परिषद विमाननगर, पुणे येथील फोर पॉइंट्स बाय शेरेटन हॉटेलमध्ये ६ व ७ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसांदरम्यान आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या उद्घाटन सत्राला महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास पानसरे (भा.प्र.से.), इंडिया सूक्ष्म उद्योग मंचाचे अध्यक्ष श्री. विनोद कुमार, महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती प्रशाली दिघावकर, तसेच मंचाच्या महासंचालिका श्रीमती सुषमा मोरथानिया उपस्थित होत्या.

या परिषदेत १६ देशांतील ४१ परदेशी खरेदीदार तसेच महाराष्ट्रातील ३०० हून अधिक सूक्ष्म व लघु उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले. परिषदेदरम्यान ५०० हून अधिक व्यावसायिक बैठका घेण्यात आल्या. या बैठकींत उद्योगांमधील सहकार्य, निर्यातवृद्धी, उत्पादन गुणवत्ता, तंत्रज्ञान देवाणघेवाण व नव्या व्यावसायिक संधींवर सखोल विचारविनिमय झाला.

महाराष्ट्रातील उद्योजक आणि परदेशी खरेदीदार यांच्यात एकूण ३२ सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे राज्यातील सूक्ष्म व लघु उद्योगांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडले जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या परिषदेत निर्यातविषयक मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय व्यापारातील संधी, निर्यात प्रक्रियेतील अडथळे, गुणवत्तेचे जागतिक निकष, व्यापार प्रोत्साहन धोरणे आणि तांत्रिक सक्षमीकरण या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. समारोप सत्रास भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय रॅम्प विभागाचे उपसंचालक नरेंद्र जीना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. त्यांनी सहभागी उद्योजकांचे अभिनंदन करताना सूक्ष्म उद्योगांनी जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवकल्पना, गुणवत्ता आणि प्रामाणिकता या तिन्ही अंगांनी सज्ज राहावे, असे आवाहन केले.

या द्वितीय आंतरराष्ट्रिय खरेदीदार-विक्रेता परिषदेच्या यशस्वी आयोजनातून महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे वाटचाल करण्याचा, निर्यात क्षमतेला चालना देण्याचा आणि राज्याच्या औद्योगिक प्रगतीला गती देण्याचा नवा टप्पा गाठला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×