Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची २९ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात

चोरट्यांविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची २९ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.

अचानक ब्रेक दाबल्यामुळे दुचाकी घसरली – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक कर्वे रस्ता परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. सुरुवातीला चोरट्यांच्या खात्यात ज्येष्ठाने काही रक्कम जमा केली. रक्कम जमा केल्यानंतर त्यांना परतावा मिळाल्याचे चोरट्यांनी भासविले. मात्र, प्रत्यक्षात परतावा दिला नाही. चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले.

चोरट्यांच्या बँक खात्यात त्यांनी वेळोवेळी २९ लाख ३० हजार रुपये जमा केले. रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना प्रत्यक्षात परतावा दिला नाही. ज्येष्ठाने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×