Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

अचानक ब्रेक दाबल्यामुळे दुचाकी घसरली

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

तरूण ठार, मित्र जखमी

marathinews24.com

पुणे – भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने समारून आलेले वाहन पाहून ब्रेक दाबल्यानंतर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरूण गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा नुकताच मृत्यू झाला आहे. अपघातात त्याचा मित्र जखमी झाल्याची घटना १५ डिसेंबरला संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास लोहगाव-वाघोली रस्त्यावरील कलश फर्निचरसमोर घडली होती.

प्रवासात जेष्ठाकडील साडेतीन लाखांच्या ऐवजाची चोरी – सविस्तर बातमी

प्रदीपसिंह रामेश्वरसिंह सेंगर (वय ४५ रा. लोहगाव ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिकंदर अछाबर चौहान (वय ३३ रा. लोहगाव ) याने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीपसिंह आणि त्याचा मित्र सिकंदर हे १५ डिसेंबरला दुचाकीवरून प्रवास करीत होते. लोहगाव-वाघोली रस्त्यावरील कलश फर्निचरसमोर दुचाकी चालक प्रदीपसिंहने अचानकपणे वाहन पाहिल्यानंतर गाडीचा बे्रक दाबला. त्यामुळे दुचाकी घसरून दोघेही खाली पडले. गंभीररित्या जखमी झालेल्या प्रदीपसिंहचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×