Breking News
राष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांच्या मुलासह व्याहीविरूद्ध गुन्हा दाखलरास्तभाव दुकानातून तीन महिन्याचे धान्य मिळणार जूनमध्येचताेतया वकील महिलेने उकळली ६ लाखांची खंडणीसफाई कर्मचाऱ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांचा डाटाबेस तयार करावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणीडी.एल.एड. द्वितीय वर्षाच्या परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ३० मे रोजीनीलेश चव्हाण याला पकडल्याचा पोलिस नियंत्रण कक्षाला फोनमुलींची छेड काढण्यावरुन महिलेने तरुणाच्या कानाचा घेतला चावावाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधीपुण्यात भाजप आमदाराच्या घरात मद्यपी शिरला

मोटारीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू – मोटारचालक अटकेत

ज्येष्ठ नागरिकाचा अपघाती मृत्यू; मोटारचालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

marathinews24.com

पुणे – भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन केंद्र परिसरात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मोटारचालकाला अटक केली. बाळासाहेब रामभाऊ चव्हाण (वय ६३, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक दानिश हसन शेख (वय ३२, रा. आदर्शनगर, उरुळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) याला अटक केली. आकाश चव्हाण (वय २६) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : सराइताकडून भर चौकात महिलेचा विनयभंग -सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब चव्हाण हे मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरुन निघाले होते. द्राक्ष संशोधन केंद्रासमोर भरधाव मोटारीने पादचारी चव्हाण यांना धडक दिली. अपघातात चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मोटाराचालक शेख याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे तपास करत आहेत.

खराडी भागात भरधाव पीएमपी बसच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची नुकतीच घडली. शहरात वाहनांच्या धडकेत पादचारी मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बहुतांश अपघातांमागे भरधाव वेग आणि वाहनचालकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top