Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

कलंकित मंत्र्यांविरोधात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कलंकित मंत्र्यांविरोधात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

‘कलंकित मंत्री हटवा, मुख्यमंत्री राजीनामा द्या’ घोषणा

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे जिल्हा व शहराच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ‘महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन’ जोरदारपणे पार पडले. ‘कलंकित मंत्री हटवा, मुख्यमंत्री राजीनामा द्या’ या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा भ्रष्ट, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या, डान्सबार चालवणाऱ्या, रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना पाठीशी घालण्याऐवजी तात्काळ मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा, अन्यथा त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी ठाम मागणी केली.

विविध मागण्यांसाठी स्टेशन मास्टरांचे आंदोलन – सविस्तर बातमी  

शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, “आजचे हे युती सरकार हे कलंकित सरकार असून, सामान्य जनतेला दिशाभूल करत आहे. महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणाऱ्या मंत्र्यांना सत्ता टिकवून ठेवणे म्हणजे लोकांचा विश्वासघात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना राज्यभर अधिक आक्रमक आंदोलन करेल. शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, प्रकाश भेगडे, उल्हास शेवाळे, अशोक खांडेभराड, संजय काळे, संतोष मोहोळ, राम गायकवाड, रवींद्र मुजुमले, गणपत खाटपे, राजाराम बाणखेले, सचिन पासलकर, रामभाऊ पारिख, आबा कुंभारकर, आबा निकम, प्रशांत राणे, अनंत घरत, पंढरीनाथ खोपडे, राकेश मांढरे, प्रशांत बधे, सचिन खैरे, पोपट शेलार, भोलेनाथ पडवळ, किरण देशमुख, संजय देशमुख, राहुल शिंदे, सयाजी शिंदे, गणेश शिवले, मकरंद पेटकर, राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, दीपक शेडे, दिलीप पोमन, बाळासाहेब मोडक, रमेश शिरसागर, बाळासाहेब भांडे, सचिन भगत, किशोर रजपूत, रुपेश पवार, चंदन साळुंखे, दीपक जगताप, नागेश खडके, शशिकांत पापळ, राहुल शेडगे, नितीन निगडे, अमर मारटकर, संतोष भुतकर, प्रवीण रणदिवे, संतोष ढोरे, सचिन चिंचवडे, परेश खांडके, अमोल काळे, पुरुषोत्तम विटेकर, सूर्यकांत पवार, हरिश्चंद्र सपकाळ, राजेश मोरे, उत्तम भुजबळ, अमोल देवळेकर, युवराज पारिख, सागर पाटील, मुकुंद चव्हाण, प्रवीण डोंगरे, गिरीश गायकवाड, जुबेर शेख, पराग थोरात, रमेश परदेशी, सुरज खंडागळे, हेमंत धनवे, विजय रावडे, राजाराम नवघणे, संदीप आमले, दत्ता घुले, प्रथमेश भुकन, तेजस मर्चंट, ज्ञानेश्वर डफळ, अमोल दांगट, अनिल परदेशी, बाळासाहेब गरुड, सुनील गायकवाड, शंतनू उभे, अनिल दामजी, दत्ता देवकर, मिलिंद पत्की, संजय लाहोट, राजेश राऊत.

स्वाती ढमाले, पद्मा सोरटे, विद्या होडे, रेखा कोंडे, रोहिणी कोल्हाळ, सलमा भाटकर, अमृता पठारे, निकिता मराटकर, ज्योती चांदेरे, करुणा घाडगे, सोनाली सोनवणे, सीमा मगर, ज्योती वीर, सीमा गायकवाड, सविता गोसावी, स्नेहल पाटोळे, सरोज कसबेकर. शिवसेनेचे हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भव्य, उत्स्फूर्त आणि घोषणाबाजीने गाजले. पुढील टप्प्यात महाराष्ट्रभर अशाच आंदोलने पेट घेणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×