Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

धक्कादायक मुलगा रडतो, दुसर्‍या लग्नाच्या विचाराने बाळाला मारले, दगडावर आपटून केला खून

मृतदेह बॅगेत भरून विहरीत फेकला महिलेला अटक, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – मुलगा सतत रडत असल्याच्या रागातून आणि दुसरे लग्न करण्याच्या विचारातून जन्मदात्या आईनेच ११ महिन्यांच्या बाळाला कपडे धुण्याच्या ओट्यावर आपटून मारल्याची धक्कादायक घटना ८ मार्चला रांजणगाव एमआयडीसी परिसरातील भांबर्डे गावात घडली आहे. याप्रकरणी तपासाअंती ६ एप्रिलला पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे. तिने मुलाचा खून केल्यानंतर मृतदेह कपड्याच्या बॅगेत भरून जवळच्या विहरीत फेकून दिला. मृतदेह पाण्यावर तरंगू नये, यासाठी बॅगेमध्ये दगड भरल्याचेही उघडकीस आले आहे. दरम्यान, मातेच्या कृतीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसरळी आहे.

आयपीओमध्ये गुंतवणूकीचे आमिष, ४३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पूजा रविंद्र पवार (वय २२) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. यश रवींद्र पवार वय ११ महिने असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मौजे भांबार्डे गावातील रहिवासी रविंद्र अशोक पवार यांनी ८ मार्चला त्याची पत्नी पूजा रविंद्र पवार (वय २२) हिने ११ महिन्यांच्या मुलगा यशसह घर सोडल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, ५ एप्रिलला संबंधित महिला जांबूत गावाच्या हद्दीत सापडली. त्यावेळी टाकळी हाजी पोलीस चौकीतील अधिकार्‍यांनी चौकशी केली असता, तिने मुलगा ओट्यावरून पडून मृत झाल्याचे सांगितले. त्यानंतर भीतीपोटी त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरून विहिरीत टाकल्याची कबुली दिली. माहितीच्या आधारे रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनास्थळी पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक पथक व वैद्यकीय अधिकार्‍यांनी पाहणी करून पुरावे गोळा केले. मृतदेह पूर्णपणे विघटित अवस्थेत असल्याने घटनास्थळीच पंचनामा व शवविच्छेदन केले.

तपासादरम्यान धक्कादायक सत्य उघडकीस आले असून, मुलाची आई पूजानेच ११ महिन्यांच्या यशला कपडे धुण्याच्या ओट्यावर आपटून ठार मारल्याचे उघडकीस आले. मुलाचा सतत रडण्याचा त्रास होत असल्याने आणि दुसरे लग्न करण्याच्या विचारातून मुलगा अडथळा ठरेल, याच कारणावरून तिने चिमुरड्याचा खून केल्याची कबुली दिली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी तिने मृतदेह बॅगेत टाकून विहिरीत फेकून दिला. याप्रकरणी ६ एप्रिलला गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजाला अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, एपीआय अशोक चव्हाण, उपनिरीक्षक निळकंठ तिडके, विलास आंबेकर, नितीन भोस, किशोर शिवणकर, अभिमान कोळेकर, पांडुरंग साबळे, मच्छिंद जागृती, निलम जाधव, नितीन दळवी यांनी केली.

नवर्‍यासोबत सतत वाद होत असल्यामुळे आरोपी महिलेला दुसरे लग्न करायचे होते. मात्र, मुलगा असल्यामुळे कोणीही लग्न करणार नसल्यामुळे तिने स्वतःच्या ११ महिन्यांच्या मुलाचा दगडावर आपटून खून केला. याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×