Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कोंढव्यात रिक्षा चालकावर गोळीबार

लग्नाच्या आमिषाने अभियंत्याची ९८ लाखांची फसवणूक

चौघे अटकेत

marathinews24.com

पुणे – रिक्षा वळविताना झालेल्या वादातून टोळक्याने रिक्षा चालकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यात घडली. टोळक्याने रिक्षा चालकाला शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चौघांना अटक केली. कुणाल उर्फ नन्या जाधव, आदित्य घावरे, अक्षय ज्ञानेश्वर जावळे (वय २०, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता), शिवाजी पांडुरंग मरगळे (वय २१, रा. शिवतेजनगर, कोल्हेवाडी, सिंहगड रस्ता) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेले साथीदार जितू जाधव, प्रथमेश पवार, मयूर सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रिक्षा चालक इक्राहिम उर्फ अज्जू अहमद शेख (वय ४८, रा. अश्रफनगर, कोंढवा ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लष्करी अधिकाऱ्याच्या घरातून मद्याच्या बाटल्या चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक शेख हे ८ मार्चला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कोंढव्यातील काकडे वस्ती परिसरातून निघाले होते. पुणे महापालिकेच्या क्रीडांगणाजवळ शेख रिक्षा वळवित होते. त्यावेळी आरोपी जाधव, घावरे, जावळे आणि साथीदार दुचाकीवरुन निघाले होते. रिक्षा वळवत असताना दुचाकीस्वार आरोपी समोर आले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला.

आरोपींनी शेख यांच्याशी वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्यांच्याकडील असलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला. शेख यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या शेख यांनी कोंढवा पाेलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास करुन पसार झालेल्या चौघा आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×