Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

वानवडीत मध्यरात्री शटर उचकटले; एक्सपोर्ट कंपनीतून वायर लंपास

गंजपेठेत भरदिवसा घरफोडी, सव्वा लाखांचा ऐवज चोरीला

चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – औद्योगिक वसाहतीत नामांकित एक्सपोर्ट कंपनीचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल ३ लाख ७९ हजार रुपयांची महागडी कॉपर वायर चोरून नेल्याची घटना वानवडीतील रामटेकडीत घडली आहे.. सुमीत श्रीचंद तेजवाणी (वय ४७, रा. सोपानबाग, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्लॉट विक्रीच्या बहाण्याने १५ लाखांना गंडा – सविस्तर बातमी

फिर्यादी यांची ‘तेजवाणी एक्सपोर्ट्स’ नावाची कंपनी वानवडीतील रामटेकडी भागात आहे. दि. १६ एप्रिलच्या रात्री चोरट्यांनी कंपनीच्या शटरचा कडी-कोयंडा तोडला आणि शटर उचकटून आत प्रवेश केला. गोदामात ठेवलेले ‘पॉलिकॅब’ कंपनीचे वायरचे कॉइल्स असलेले बॉक्स चोरट्यांनी लंपास केले. सोमवारी सकाळी जेव्हा कर्मचारी कंपनीत आले, तेव्हा शटर उचकटलेले दिसले. मालाची मोजणी केली असता ३ लाख ७९ हजार १९४ रुपये किमतीचे वायर चोरीला गेल्याचे समोर आले. चोरट्यांनी अत्यंत सराईतपणे ही चोरी केली असून पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत. याप्रकरणाचा तपास वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महाडिक करत आहेत.

भरधाव डंपरचा दुचाकीला धडक; बारामतीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे- भरधाव वेगाने जाणाऱ्या एका डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात बारामती येथील ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक जखमीला मदत करण्याऐवाजी वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला. गौरीशंकर शिवराज सपळे (वय ३५, रा. बारामती) असे मयत तरुणाचे नाव आहे. शिवशंकर शिवराज सपळे (वय ३८, रा. उस्मानाबाद) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दि. 21 एप्रिलला दुपारी चार वाजण्याच्‍या सुमारास लोणी काळभोर येथील प्रगती मंगल कार्यालयासमोरील सार्वजनिक रस्‍त्‍यावर अपघात झाला.

गौरीशंकर हे दुचाकीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की गौरीशंकर यांच्या शरीराला गंभीर जखमा झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालकाने रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करून हलगर्जीपणाने वाहन चालवल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक माळी करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×