Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

गणेशोत्सवात गांजा विक्रीसाठी पुण्यात आलेल्या तस्कराला अटक

२८ किलो गांजा जप्त

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवात शहरात विक्रीसाठी पाठविण्यात येणारा २८ किलो गांजा वाघोली पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी धुळ्यातील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून गांजा, मोटार असा १० लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. विलेश धारासिंग पावरा (वय २२, रा. ता. शिरपूर, जि. धुळे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पावरा याच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘एनसीएल’च्या आवारात चंदनाची झाडे चोरणारे अटकेत – सविस्तर बातमी

गणेशोत्सवात शहरात गांजा विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात एका हाॅटेलजवळ पोलिसांनी सापळा लावला. हाॅटेलजवळ मोटार थांबली होती. पोलिसांनी मोटारचालक पावरा याच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. मोटारीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा सापडला. पावरा याच्याकडून दहा किलो गांजा जप्त करण्यात आला. पावरा याने गांजा कोठून आणला, तसेच कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत अहे.

परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंढे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक आसाराम शेटे, उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस कर्मचारी रमेश साबळे, बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, सचिन कोकरे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×