Breking News
फुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदतपुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

सोलापूरच्या महिला शिवसैनिकांचा ठाकरेंना जोरदार धक्का

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

marathinews24.com

पुणे – सोलापूर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील महिलांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा संघटिका अमिता जगदाळे यांच्यासह अनेक प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी आज पुण्यातील सिल्व्हर रॉक्स निवासस्थानी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

डॉ. आंबेडकर स्मारक विस्तारीकरणासाठी प्रस्तावित जमीन विकासकाकडून पुन्हा ताब्यात – सविस्तर बातमी

प्रवेश सोहळ्यात लोकसभा संघटिका मंगल मोरे, सोलापूर उत्तर संघटिका भारती मुनोळी, उपजिल्हा संघटिका ललिता झळके, शहर संघटिका सोनाली भोसले, विधानसभा संघटिका दीपाली पवार, उपशहर संघटिका नागू कनमुशे यांच्यासह इतर महिला पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाण हाती घेतला. हा प्रवेश उत्साहात पार पडला. कामगार सेना प्रदेशाध्यक्ष सुधीर कुरूमकर, युवासेना सचिव किरण साळी, पुणे शहर सचिव संदीप शिंदे उपस्थित होते.

शिंदे गटाच्या वाढत्या ताकदीला आणि विकासाच्या कामांना प्राधान्य देत या महिला शिवसैनिकांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. या प्रवेशामुळे सोलापूरातील शिवसेनेची ताकद आणखी वाढली असून, उद्धव गटाला मात्र मोठा फटका बसला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, महिलांसाठी राबविण्यात आलेल्या धोरणांमुळे आणि पक्षाच्या मजबूत नेतृत्वामुळे महिलांचे मोठ्या संख्येने पक्षात ओघ सुरू आहे. या सर्व महिलांच्या जोडीनं पक्ष आणखी बळकट होईल आणि आगामी काळात महिलांच्या विकासासाठी आम्ही एकत्रपणे काम करू. पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे मनापासून स्वागत असल्याचे त्यांनी म्हटले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×