Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात विशेष वाहतूक व्यवस्था

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

दर्शनासाठी १० ठिकाणी वाहनतळाची सुविधा

marathinews24.com

पुणे – संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा दिनांक ९ ते १० जुलै २०२६ या कालावधीत पुणे शहरात संयुक्त मुक्काम असल्याने दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच वाहतूक सुरक्षित, सुरळीत आणि नियोजनबद्ध राहावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचा वापर करून पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी पालखी मार्ग व परिसरातील वाहतुकीत आवश्यकतेनुसार तात्पुरते बदल लागू केले आहेत. अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारी वाहने तसेच लग्नसमारंभाची वाहने यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले दर्शन – सविस्तर बातमी 

समर्थ वाहतूक विभागाच्या हद्दीत दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी खालील ठिकाणी विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

टिळक आयुर्वेद महाविद्यालय रास्ता पेठ, ऑर्नेलास हायस्कूल कॉटर गेट चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य, कला महाविद्यालय नाना पेठ, लक्ष्मी मार्केट, नाना पेठ (नेहरू रोड), स. गो. बर्वे प्राथमिक विद्यालय रास्ता पेठ, रफी अहमद किडवाई हायस्कूल भवानी पेठ, शांताबाई लडकत प्राथमिक विद्यालय नाना पेठ, स. गो. बर्वे शाळा रास्ता पेठ, मार्कंडेय विद्यालय नाना पेठ, सावित्रीबाई फुले शाळा भवानी पेठ.

पुणे शहर वाहतूक शाखेने भाविकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून केवळ अधिकृत वाहनतळाचाच वापर करावा, असे आवाहन केले आहे.अधिक माहितीसाठी वाहतूक मुख्य नियंत्रण कक्ष येथे ७२६६८५००० किंवा ०२०-२६६८४००० या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×