भरधाव टँकरची दुचाकीला धडक; तरुण ठार

मोहम्मदवाडीतील क्लाऊड नाईन परिसरात घडला अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव टँकर चालकाने दिलेल्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.५ ) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोहम्मदवाडीतील क्लाऊड नाईन परिसरात घडला आहे.आरिफ शेख (वय १९) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी टँकर चालक रवींद्र भीमराव दनाने (वय ३४) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार आरिफ शेख हा रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोहम्मदवाडी परिसरातून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी भरधाव टँकर चालक रवींद्र दनाने याने दुचाकीला धडक दिली. अपघातात आरिफ गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले.
याप्रकरणी टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास काळेपडळ पोलीस करत आहेत. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे भरधाव वाहनांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×