Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुणे जिल्हा परिषद आयोजित ‘मिनी सरस सावित्री जत्रा २०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

युगांडा सरकारच्या शिष्टमंडळाची जत्रेला भेट

marathinews24.com

पुणे – पुणे जिल्हा परिषद आयोजित “मिनी सरस सावित्री जत्रा २०२६” या जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वयंसहाय्यता समूहांच्या महिलांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार उत्पादनांना या माध्यमातून व्यापक बाजारपेठ उपलब्ध होत असून महिला सक्षमीकरणाला चालना मिळत आहे.
जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांच्या नेतृत्वाखाली या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या जत्रेला काल युगांडा सरकारच्या शिष्टमंडळाने विशेष भेट दिली. इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन सेंटर तसेच सार्वजनिक सेवा मंत्रालय आणि विज्ञान, तंत्रज्ञान व नवोपक्रम मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी स्वयंसहाय्यता समूहांच्या विविध स्टॉलना भेट देत महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची पाहणी केली. काही वस्तूंची खरेदी करून त्यांनी ग्रामीण महिलांच्या कौशल्याचे व उद्योजकतेचे कौतुक केले. यावेळी Intreden Exim Private Limited चे मुख्य कार्यकारी अधिकारीही उपस्थित होते.

देशातील वाढत्या रस्ते अपघातांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे – प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी – सविस्तर बातमी

जत्रेनिमित्त आयोजित खरेदीदार–विक्रेता मेळाव्यालाही विविध कंपन्या व खरेदीदार गटांनी भेट दिली. त्यांनी स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांची पाहणी करून अनेक उत्पादनांसाठी ऑर्डर्स नोंदविल्या. तसेच महिलांना व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने उत्पादनांचे प्रभावी मार्केटिंग कसे करावे याविषयी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी जत्रेला रंगत आणली. आंबेगाव तालुक्यातील तिरपाड ग्रामपंचायतीच्या महिलांनी पारंपरिक लेझीम नृत्य सादर केले, तर बारामती येथील महिलांनी स्वयंसहाय्यता समूहांच्या कार्यावर आधारित पथनाट्य सादर केले.
लोकप्रिय युट्यूब चॅनल  ‘सरिताज किचन्स’ च्या सरिता पद्मन यांनी उपस्थित राहून व्हेज बिर्याणीचे प्रात्यक्षिक दाखवले तसेच अन्नपदार्थ व्यवसायातील संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच ‘चांडाळ चौकडी’ मालिकेच्या टीमने मनोरंजनात्मक सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली.

या उपक्रमाचे जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पुणे यांच्या टीमने नियोजनबद्ध व समन्वयपूर्ण पद्धतीने आयोजन केले आहे. ग्रामीण संस्कृतीचा वसा आणि महिलांच्या उद्योजकतेचा वारसा जपणारी ही “मिनी सरस सावित्री जत्रा २०२६” पुणेकरांसाठी १० व ११ मार्च रोजीही खुली राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×