Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

महिला क्रिकेट विश्वविजेत्यांची राज्य शासनाने थोपटली पाठ

प्रत्‍येकी सव्वा दोन कोटी रुपयांचे दिले बक्षीस; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान

marathinews24.com

मुंबई – ऐतिहासिक विश्वविजेत्या भारतीय संघात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणा-या महाराष्ट्राच्या क्रिकेटपटू स्मृति मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज,राधा यादव यांचा या अद्वितीय कामगिरी बद्दल महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येकी रोख सव्वा दोन कोटी रुपयांचा धनादेश देऊन आज गौरविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या हस्‍ते शाल, भेटवस्‍तू व धनादेश देऊन स्मृति मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज,राधा यादव यांच्‍यासह ऐतिहासिक विश्व विजयाचे शिल्पकार भारतीय संघाचे क्रीडा मार्गदर्शक अमोल मुजुमदार यांचा सन्मान करण्यात आला.

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक संपन्न – सविस्तर बातमी

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, मंत्री, माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार मंत्री, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, आयुक्त शीतल तेली-उगले उपस्थित होत्या. वैयक्‍तिक क्रिकेटपटूंना सर्वाधिक रक्‍कम देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिलेच राज्‍य ठरले आहे. याप्रसंगी क्रिकेट संघाच्या सपोर्टिंग स्टाफसाठी प्रत्येकी ११ लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली

भारतीय महिला क्रिकेट संघाचा वरिष्ठ स्तरावरील हा पहिलाच आयसीसी विश्वचषक विजय असून, या देदीप्यमान यशामुळे जागतिक स्तरावर भारताचा व पर्यायाने महाराष्ट्र राज्याचा गौरव झालेला आहे. असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्‍हणाले की महिला विश्वचषक विजेत्यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने झालेला सन्मान सोहळा हा केवळ एक अभिनंदनपर कार्यक्रम नव्हता, तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात महाराष्ट्राच्या महत्त्वपूर्ण आणि वाढत्या भूमिकेची अधिकृत नोंद आहे. स्मृती मंधाना, जेमिमा रोड्रिग्ज, राधा यादव आणि प्रशिक्षक अमोल मजूमदार यांच्या रूपाने महाराष्ट्र राज्य देशाच्या क्रीडा नकाशावर आपला ठसा निश्चितपणे उमटवत आहेत, असे सांगितले.

राज्याने दिलेले २ कोटी २५ लाख रुपयांचे भव्य आर्थिक प्रोत्साहन अत्यंत स्तुत्य आहे. महिला क्रीडा क्षेत्रातील आर्थिक असमानता दूर करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या निर्णयामुळे महिला खेळाडूंना व्यावसायिक सुरक्षितता मिळण्यास मदत होईल आणि पुढील पिढीला खेळात करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे नाव उजळवणाऱ्या क्रीडापटूंचा सत्कार करण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन वचनबद्ध असल्‍याची क्रीडामंत्री अ‍ॅड. माणिकरावजी कोकाटे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×