Breking News
स्वतः च्या गाडीवर घडवून आणला गोळीबारघरफोडीप्रकरणी आरोपीला अटक, बंडगार्डन पोलिसांची कामगिरीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादनरिक्षावर झाड कोसळून प्रवाशी जेष्ठ महिला ठारनागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटीबद्ध – पोलीस आयुक्त अमितेश कुमारपुण्यात बेशिस्त वाहन चालकांवर एआय द्वारे कारवाईशिरुर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहनअण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज योजनेचा ९ हजार ६२३ अर्जदारांना लाभपर्यावरण दिनानिमित्त ‘वृक्षाथॉन- २०२५ ’चे १ जून रोजी आयोजनबँक व्हेरिफिकेशनच्या नावाखाली १२ लाखांचा गंडा

मुयरी जगताप विषयीच्या बातमीचे राज्य महिला आयोगाकडून खंडण

मयुरी जगताप

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण

marathinews24.com

पुणे – पुणे जिल्ह्यातील मयत  वैष्णवी हगवणे यांची जाऊ मयुरी जगताप हगवणे यांना कौटुंबिक छळास सामोरे जावे लागत असल्याची तक्रार मेघराज जगताप आणि लता जगताप यांनी ६ नोव्हेंबर २०२४ रोजी ई-मेलद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाखल केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर ७ नोव्हेंबर २०२४ रोजी या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पौड पोलिस स्टेशन यांना या प्रकरणात कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिले आहे.

पिस्तुलाचा धाकाने पिता-पुत्राला जिवे मारण्याची धमकी; माजी सैनिक अटकेत – सविस्तर बातमी

पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेऊन १९ मे २०२५ रोजी बावधन पोलिसांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बावधन पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे. त्याचप्रमाणे श्रीमती मयुरी जगताप यांच्या कौटुंबिक छळाच्या प्रकरणातही पोलीसांना कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्यानुसार त्यांनी तक्रार दाखल करुन पुढील तपास केला. पोलीस तपासाबाबत असमाधानी असल्याचे किंवा इतर कुठल्याही बाबींबाबत त्यानंतर तक्रारदार किंवा त्यांच्या कुटुंबियांनी आयोगाशी संपर्क साधलेला नाही.

पौंड पोलिसांनी गुन्हा रजि नं. ४८५/२०२४ भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ७४,११५,३५२,२९६, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशाने ३१ जानेवारी २०२५ रोजी बावधन पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला. मयुरी जगताप यांच्या प्रकरणी २२ मे २०२५ रोजी १०२/२०२५ अन्वये मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

तक्रारदारांना याबाबतीत काही आक्षेप असल्यास आणि त्यांनी आयोगाकडे मदत मागितल्यास राज्य महिला आयोग न्यायोचित मदत करण्यास बांधील असून, अपुऱ्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाविरोधात जारी करण्यात येणाऱ्या वृत्ताचे महाराष्ट्र राज्य महिला आयोग खंडन करीत असल्याचेही डॉ. बैनाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top