Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई

पुणे विभागात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाईचा इशारा

marathinews24.com

पुणे – राज्यात वाळू तसेच इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करीचे प्रकार रोखण्यासाठी महसूल व वन विभागामार्फत “महाराष्ट्र गौण खनिज (विकास व विनियमन) नियम, २०१३ लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार संबंधित विभागांमार्फत समन्वयाने कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.

महामाता रमामाई आंबेडकर यांच्या नावाने भव्य सांस्कृतिक भवन उभारू : अण्णा बनसोडे – सविस्तर बातमी

राज्य परिवहन प्राधिकरण, पुणे यांनी कळविल्यानुसार वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वापर व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम तसेच त्याअंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती या कार्यक्षेत्रांमध्ये करण्यात येईल.
गुन्ह्यानुसार कारवाईचे स्वरूप पुढीलप्रमाणे ठरविण्यात आले आहे.

पहिला गुन्हा : वाहन अटकाव करून ठेवणे व परवाना ३० दिवसांसाठी निलंबित करणे.

दुसरा गुन्हा : वाहन अटकाव करून ठेवणे व परवाना ६० दिवसांसाठी निलंबित करणे.

तिसरा गुन्हा : वाहन अटकाव करून ठेवणे व परवाना कायमस्वरूपी रद्द करणे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून अवैध उत्खनन व वाहतुकीविरुद्ध संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही शिथिलता न दाखवता तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×