Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

पीएमजेएवाय व एमजेपीजेएवाय योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या अंगीकृत खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी

पीएमजेएवाय व एमजेपीजेएवाय योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या अंगीकृत खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी

मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश; प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची विभागीय आढावा बैठक

marathinews24.com

पुणे – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (पीएमजेएवाय) व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या अंगीकृत खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे दिले.

कामगार योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दोन कोटींपर्यंत वाढवावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर – सविस्तर बातमी   

आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (पीएमजेएवाय) व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) योजनेची विभागीय आढावा बैठक आकुर्डी येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात पार पडली.

या बैठकीस पुणे, नाशिक, कोल्हापूर, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर विभागातील क्षेत्रीय व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक तसेच तृतीय पक्ष प्रशासक (टीपीए) प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व जिल्ह्यांनी आपल्या पालकमंत्र्यांची वेळ घेऊन योजनांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करावी, अशा सूचना आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिल्या. तसेच जिल्हा समन्वयक व क्षेत्रीय व्यवस्थापक यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटून योजनांची माहिती द्यावी व सातत्याने समन्वय राखावा, असे निर्देश त्यांनी दिले.

प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे का, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. सर्व शासकीय रुग्णालयांनी अंगीकृत होऊन येणाऱ्या प्रत्येक पात्र रुग्णावर उपचार योजनेंतर्गतच करावेत, असे स्पष्ट करण्यात आले. अंगीकृत खासगी रुग्णालयांविषयी तक्रारी आढळल्यास संबंधित रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० किंवा त्याहून अधिक खाटांची रुग्णालये अंगीकृत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले.

या बैठकीमुळे पीएमजेएवाय व एमजेपीजेएवाय योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक होऊन लाभार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व मोफत उपचार मिळण्यासाठी प्रशासन अधिक वेगाने कार्य करेल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×