Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सुधारित शुल्क रचनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परताव्याचा अधिकाधिक लाभ

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्देशानुसार विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय

marathinews24.com

पुणे – सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्क रचनेबाबत प्राप्त झालेल्या निवेदनांची दखल घेत, विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने विद्यापीठाच्या शुल्क रचनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

बालिका अत्याचारासह हत्या; दोषींविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणार-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – सविस्तर बातमी

या संदर्भात मंगळवार, दि. १८ ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दालनात अपर मुख्य सचिव श्री. रेड्डी तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी जाहीर केलेल्या शुल्क रचनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि शासनाची उच्च व तंत्रशिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची भूमिका लक्षात घेऊन शुल्क रचनेची फेररचना करण्याचे निर्देश मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

विद्यार्थ्यांना शासनाच्या शिक्षण शुल्क परतावा योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी शुल्क नियामक प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शुल्क रचना करण्याचे निर्देश विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार शुल्क रचनेतील ‘इतर शुल्क’ हे शैक्षणिक शुल्कामध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

या सुधारित शुल्क रचनेचा लाभ विशेषतः इतर मागासवर्गीय , विमुक्त जाती व भटक्या जमाती , आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना होणार आहे. सुधारित शुल्क रचनेमुळे शासनाकडून मिळणाऱ्या शिक्षण शुल्क परताव्याचा अधिकाधिक लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शुल्क रचनेत सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन व निर्देश दिल्याबद्दल सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ प्रशासनाने राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×