Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पुण्यात विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा

पुण्यात विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा

समाज कल्याण विभागात विविध उपक्रम

marathinews24.com

पुणे – आजचा विद्यार्थी हा देशाच्या भविष्यातील पाया असून आदर्श विद्यार्थी घडविणे ही काळाची गरज असल्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. २७ ऑक्टोबर २०२५ च्या शासन परिपत्रकानुसार विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयामार्फत दि. ७ नोव्हेंरला सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, पोलिस स्टेशनसमोर, येरवडा येथे “विद्यार्थी दिवस” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

महिला क्रिकेट विश्वविजेत्यांची राज्य शासनाने थोपटली पाठ – सविस्तर बातमी 

कार्यक्रमाचे अध्यक्ष विशाल लोंढे, सहायक आयुक्त, समाज कल्याण होते. कार्यक्रमात “शिक्षण हे याघिणीचे दूध” या विषयावर ऍड. बिभीषण गदादे यांचे प्रेरणादायी व्याख्यान घेण्यात आले. यावेळी विशेष अधिकारी माधुरी वाघमोडे, सहाय्यक लेखाधिकारी विलास पाटील तसेच समाज कल्याण विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. तसेच ‘वंदे मातरम’ गीतास १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने उपस्थित मान्यवर विद्यार्थी
विद्यार्थिनींनी सामूहिकरित्या ‘वंदे मातरम’ गीताचे गायन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी वाघमोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विलास पाटील यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×