Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

विधिमंडळात विद्यार्थ्यांची अभ्यासक भेट; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद ठरला आकर्षण

विधिमंडळात विद्यार्थ्यांची अभ्यासक भेट; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद ठरला आकर्षण

बालविद्यार्थ्यांशी संवादातून धोरणांची माहिती; मंत्री आदिती तटकरे यांचा सहभाग

marathinews24.com

मुंबई – विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० लहान विद्यार्थ्यांनी आज विधानभवनाला अभ्यासक भेट दिली. या भेटीदरम्यान उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी बालविद्यार्थ्यांशी साधलेला संवाद विशेष आकर्षण ठरला.

रोजगाराच्या नावाखालील फसवणुकीपासून सावध रहा – कामगार उपआयुक्तांचे आवाहन – सविस्तर बातमी 

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी अतिशय सोप्या आणि लहान मुलांना समजेल अशा भाषेत विधिमंडळाचे कामकाज उलगडून सांगितले. “जशी शाळेत शिस्त पाळून नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते, तसेच विधानभवनातही नियमांचे काटेकोर पालन केले जाते. नियम मोडल्यास इथेही शिक्षा होते,” असे सांगत त्यांनी वरिष्ठ व कनिष्ठ सभागृह, सदस्यांची रचना आणि नियमांची अंमलबजावणी याबाबत रंजक उदाहरणांसह माहिती दिली.

बालविद्यार्थ्यांनीही उत्साहाने प्रश्न विचारत संवाद रंगवला. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुलांशी गप्पांच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय आणि धोरणांची माहिती दिली. कार्यक्रमात अनिकेत तटकरे यांनी ही दोन्ही सभागृहांची सविस्तर माहिती दिली, तर जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह अधिकारी व शाळेचे प्रतिनिधीही उपस्थित होते. बालविद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासक भेट केवळ शैक्षणिक नव्हे, तर लोकशाहीची कार्यपद्धती समजून घेण्याचा एक प्रेरणादायी अनुभव ठरली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×