Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांची रखडली शिष्यवृत्ती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांची रखडली शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

marathinews24.com

पुणे  (रेवण कोळेकर) – राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वी अर्ज सादर करूनही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांच्या शिष्यवृत्ती विभागाकडून अजूनही अर्जांची पडताळणी करून ते पुढील स्तरावर पाठवण्यात आलेले नाहीत. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

बांधकाम क्षेत्रात संशोधन व इनोव्हेशनवर भर द्यायला हवा – सविस्तर बातमी 

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती, डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना आदी महत्त्वाच्या योजनांसाठी पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरले होते. मात्र, अर्जांची विद्यापीठ स्तरावरची पडताळणीच रखडल्याने शिष्यवृत्तीची रक्कम अद्याप विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला वारंवार चौकशी केल्यानंतरही विद्यापीठ शिष्यवृत्ती विभागाकडून ठोस उत्तर न देता उडवा-उडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. काही विद्यार्थ्यांना काम सुरू आहे, सिस्टम मध्ये अडचण आहे, तर काहींना वरून आदेश आलेले नाहीत अशी परस्परविरोधी कारणे दिली जात आहेत.

विद्यापीठात शिक्षण घेत असणारे अनेक विध्यार्थी ग्रामीण भागातून आलेले असून अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीवर अवलंबून असल्याने विद्यार्थ्यांना फी भरणे, वसतिगृहाचे शुल्क, प्रवास खर्च, अभ्यासाचे साहित्य यासाठी अडचणी येत असून अनेक विद्यार्थी कर्ज घेऊ शिक्षण घेत असून काही विध्यार्थी शिक्षण सोडण्याचा विचार करत आहेत.

शासन स्तरावरून वेळोवेळी अर्जांची तातडीने पडताळणी करून पुढे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले असतानाही प्रत्यक्ष विद्यापीठाकडून अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट चित्र आहे.

विद्यार्थ्यांनी आता शासन व उच्च शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली जात आहे. शिष्यवृत्ती प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होणार असून, याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशीही जोरदार मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे.

विद्यापीठाच्या शिष्यवृत्ती विभागास ॲड. अजय देशमुख, प्रशांत इंगोले, ॲड. आकाश बंडे, ॲड. प्रथमेश वानखडे, ऋषिकेश जगताप, उमेश वीर या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती विभागास शिष्यवृत्ती लवकरात लवकर मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×