खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलात आढळले मृतदेह
marathinews24.com
पुणे – प्रेम संबंधातून तरुण-अल्पवयीन मुलीची आत्महत्या – प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलात घडली आहे. आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे गेल्या तीन वर्षापासून प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या बहिणीने गुरूवारी (दि. १०) वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पुणे इसिस मोड्यूल प्रकरणातील आणखी एका दहशतवाद्याला अटक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी दुपारी फिर्यादी यांनी त्यांच्या १६ वर्षीय बहिणीला कोचिंग क्लास साठी सोडले होते. मात्र क्लास संपल्यानंतर ती परत न आल्याने त्यांनी वानवडी पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात इसमाने बहिणीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी, एका संशयित मुलाचा देखील तपास करायला सुरुवात केली. तो मुलगा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. शुक्रवारी (दि. ११) खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलात दोघांचे (एक मुलगा आणि एक मुलगी) मृतदेह आढळून आल्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याबाबतची माहिती वानवडी पोलिसांना कळवली. या दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
विष प्राशन करून संपवले आयुष्य
खडकवासला परिसरातील जंगलात विष प्राशन करून दोघांनी आत्महत्या केली. ज्या ठिकाणी आत्महत्या केली. त्याठिकाणी पोलिसांना कुठलीही सुसाइड नोट मिळाली नाही. विषारी औषधाची बाटली घटनास्थळी पोलिसांना सापडली. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजित आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.