Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

रोहित पवारांच्या पीएच्या 12 वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू…

रोहित पवारांच्या पीएच्या 12 वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू...

रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट

marathinews24.com

बारामती – पुण्यातील बारामतीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांच्या मुलीची हत्या की आत्महत्या याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर पोलिसांचं फॉरेन्सिक पथक बारामतीमधील रुई येथील साई गणेश नगर येथे पोहोचलं आहे. या घटनेनंतर रोहित पवारांनीही बारामतीत धाव घेतली आहे. या घटनेने बारामतीत खळबळ उडाली आहे.

पोलिसांवर हल्ला करुन पसार झालेले चोरटे जेरबंद – सविस्तर बातमी 

अजित दशावतारे यांचे मुलीचे आणि तिच्या आईचे रात्री किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर ती घरातून बाहेर पडला. या प्रकरणी रात्री पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर सकाळी घराजवळच मृतदेह आढळून आला. ही मुलगी अवघ्या 12 वर्षांची होती. अजित दशावतारे यांच्या १२ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुलीचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे कारण समजू शकलेले नाही. मिळाल्या प्राथमिक माहितीनुसार, मुलगी आणि आईमध्ये रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर मुलगी रागाने घराबाहेर पडली. परंतु मुलीचा सकाळी मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनासास्थळी धाव घेतली आहे. तसेच पोलिसांनी पुरावे गोळा करण्याचेही काम सुरू केले आहे. या मुलीचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, हे तपासानंतर स्पष्ट होईल. अवघ्या 12 वर्षांच्या मुलीचा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थिती झाला, याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून याचा तपास सुरू करण्यात आला आहे. तिच्या मृत्यूमागे नेमकं वेगळे कारण आहे का, हेही तपाण्यात येणार आहे. ही सर्व माहिती तपासानंतर समोर येईल. परंतु अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने बारामतीत चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच रोहित पवार बारातमीत दाखल होत आहेत, अशी माहिती हाती आली आहे. आता बारामती पोलिसांच्या तपासानंतर या संशयास्पद आणि रहस्यमय मृत्यूमागील कारण समोर येण्याची शक्यता आहे.

रोहित पवार म्हणले…

या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, मी आता बारामती मेडिकल कॉलेजला आलेलो. माझा पीए अजित, जो माझ्याबरोबर जिल्हा परिषदेपासून आहे, त्याच्या परिवारामध्ये त्याची १५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू काल झाला, सकाळी झाला, खरंतर पोलीस आपल्याला नंतर सांगतीलच. कशामुळे झाला, काय घडलं, कसं घडलं…हे तपासानंतर आपल्याला त्याठिकाणी कळेल. पण अजित आणि त्याच्या परिवारावर दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे आणि आपल्या पोटची मुलगी, जर काही कारणांमुळे तिचा मृत्यू होत असेल, तेसुद्धा एवढ्या कमी वयामध्ये, कुठल्याही वडिलांसाठी ही गोष्ट, समजून घेण्याच्या पलीकडे असते, अशी भावना रोहित पवारांनी व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×