Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

मोबाइलद्वारे संभाषण करणे पडले महागात

दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरला लाखांचा मोबाइल

marathinews24.com

पुणे – मोबाइलद्वारे संभाषण करीत पायी चालणे तरूणाला चांगलेच महागात पडले आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी तरूणाचा पाठलाग करून त्यांच्याकडील तब्बल १ लाख रूपये किंमतीचा मोबाइल चोरून नेला. ही घटना २५ नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास कोंढवा खुर्दमधील लुल्लानगरातील पॅपीलीऑन सोसायटीसमोर घडली आहे. याप्रकरणी कोंढव्यात राहणार्‍या तरूणाने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

बालाजीनगरातील सोसायटीत दिवसा घरफोडी – सविस्तर बातमी

कोंढव्यात राहायला असून, २५ नोव्हेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास मोबाइलद्वारे संभाषण करीत पायी जात होता. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी तरूणाला गाठले. त्याच्याजवळ दुचाकी घेउन तरूणाकडील १ लाखांचा मोबाइल हिसकावून चोरटे पसार झाले. तरूणाने आरडाओरड करेपर्यंत चोरटे दिसेनासे झाले होते. दरम्यान, याप्रकरणी उशिरा तक्रार दाखल झाल्यामुळे पोलिसांनी विलंबाने गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×