Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

टेम्पो चालकाला ट्रक चालकाकडून मारहाण

‘जीममध्ये गाण्यावरुन वादातून मारहाणीची घटना

इंडोरन्स चौक महाळुंगे येथील घटना 

marathinews24.com

पिंपरी – समोरची गाडी बंद पडल्याने टेम्पो चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो थांबवला. त्यावेळी टेम्पोच्या पाठीमागून आलेल्या ट्रकने टेम्पोला धडक दिली. अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने टेम्पो चालकाला बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी रात्री इंडोरन्स चौक महाळुंगे येथे घडली.

लग्नाचं स्वप्न पडलं महागात; उच्चशिक्षित तरुणीची ३ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी 

रवी सुखदेव जाधव (वय ३९, निघोजे, खेड) असे मारहाण झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रवी जाधव टेम्पो सावरदरी येथून निघोजे येथे जात होते. इंडोरन्स चौकात आल्यानंतर त्यांच्या समोरील कार अचानक बंद पडली. त्यामुळे जाधव यांनी त्यांचा टेम्पो थांबवला. दरम्यान टेम्पोच्या पाठीमागून येणारा ट्रकने टेम्पोला धडक दिली. त्यावरून ट्रक चालकाने टेम्पो चालकाला दगडाने मारून जखमी केले. तसेच टेम्पोची तोडफोड करून नुकसान केले. या भांडणात जाधव यांचा मोबाईल फोन गहाळ झाला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×