Breking News
फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने १२ लाख ४० हजारांची फसवणूककंपनीतील कामगाराने केली १५ लाख ५० हजारांची फसवणूकआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावादेहूरोड पोलिसांनी काढली दोन गुन्हेगारांची धिंडशॉर्ट सर्किटमुळे आग विजेचे बारा मीटर जळून खाकमहिलांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवारकुंडमळा येथील घटना अतिशय दुर्देवी – खासदार श्रीरंग बारणेकुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला; तीन पर्यटकांचा मृत्यूपुण्यात आजपर्यंतच्या एन्काऊंटरमध्ये ३३ गुंडांचा खात्मासोने खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करणारी टोळी सक्रिय

लग्नाचं स्वप्न पडलं महागात…

लग्नाचं स्वप्न पडलं महागात...

उच्चशिक्षित तरुणीची ३ कोटींची फसवणूक

marathinews24.com

पिंपरी – शादी डॉट कॉम वेबसाईटवरून तरुणीशी संपर्क साधून लग्नाचे अमिष दाखवून ३ कोटी १६ लाखांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अद्याप मुख्य आरोपी फरार आहे. फसवणूक झालेल्या तरुणीकडून ८१ बँक खात्यावर पैसे घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

नीटच्या उत्तरपत्रिकेत घोटाळा? खादार सुप्रिया सुळे यांची ट्विटद्वारे चौकशीची मागणी – सविस्तर बातमी 

रणजीत मुन्नालाल यादव, सिकंदर मुन्ना खान आणि बबलू रघुवीर यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. उच्चशिक्षित असलेली तरुणी शादी डॉट कॉम संकेतस्थळावरून विवाहासाठी मुलगा शोधत होती. तेव्हा अज्ञात आरोपी आणि तिची ओळख झाली. परदेशात नामांकित कंपनीत सीईओ असल्याचे तरुणीला सांगण्यात आले. फसवणूक झालेल्या उच्चशिक्षित तरुणीचा देखील विश्वास बसला. त्यांचे व्हाट्सअप कॉलवरून दररोज बोलणे सुरू झाले. ते एकमेकांच्या अधिक जवळ आले. दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचे ठरवले होते. याचा फायदा आरोपीने घेतला.

अज्ञात आरोपीने आजारपणाचे आणि लोकांकडून घेतलेल्या कर्ज फेडीचे आणि विविध करणे देऊन २०२३ ते २०२४ दरम्यान उच्चशिक्षित तरुणीकडून तब्बल ३ कोटी १६ लाख घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले. हे कोट्यवधी रुपये आरोपीने वेगवेगळ्या ८१ बँक खात्यावर घेतले होते. पैकी ११ बँक खाते हे एकाच पत्त्यावरील होते. पैकी हे पैसे ज्या व्यक्तींच्या बँक खात्यात आले, त्या तिघांना पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसांनी दिल्ली हरियाणा बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या आहेत. हे तिघे तरुणीची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीच्या संपर्कात होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

तरुणीची फसवणूक करणारा अज्ञात आरोपी आणि बेड्या ठोकण्यात आलेला रणजीत, सिकंदर आणि बबलू हे इंस्टाग्राम कॉलच्या माध्यमातून संपर्कात होते. बबलू हा मुख्य आरोपीच्या सांगण्यावरून एटीएममधून पैसे काढून त्याला द्यायचा. या प्रकरणात आतापर्यंत ३०० ते ४०० बँक खात्याची पडताळणी करण्यात आलेली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या पथकाने केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top