कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात

कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात

कंटेनरने तीन वाहनांना दिली धडक, पाच जखमी

marathinews24.com

पुणे – भरधाव कंटेनर चालकाने तीन ते चार वाहनांना धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरूवारी (दि. ५) दुपारच्या सुमारास नवीन कात्रज बोगद्याजवळील दरीपुलावर घडला आहे. जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल केले. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अपघातामुळे परिसरातील वाहतूककोंडी निर्माण झाल्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला. अग्निशमक दलासह स्थानिक पोलीस, वाहतूक कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

पुण्यात घरफोडी करणारे ‘गँगस्टर’ जेरबंद – सविस्तर बातमी 

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज बोगद्याजवळील दरी पुलावरून कंटेनर वाहन चालक सातार्‍याच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे चालकाने पुढे जाणार्‍या वाहनांना धडक देण्यास सुरूवात केली. तीन ते चार वाहनांना धडक दिल्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मोटारीतून प्रवास करणार्‍या काही प्रवाशांना किरकोळ इजा झाली होती. तर काहींना गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. अपघाताची माहिती मिळताच, अग्निशमक दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली. कंटेनरमुळे वाहनांत अडकलेल्या जखमींना बाहेर काढताना जवानांनी प्राधान्य दिले. वाहनांचा पत्रा कापून त्यांना बाहेर काढण्यात आले.

वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप, दूरवर रांगा

कंटेनरच्या धडकेत वाहनांचे नुकसान झाले असून, इतर प्रवाशीही जखमी झाले आहेत. दरम्यान, कात्रज बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे आजूबाजूला जाणार्‍या प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागला. प्रामुख्याने महामार्गावरच कोंडी झाल्यामुळे दुपारच्या सत्रात कामाला जाणारे चाकरमानी, शहरासह उपनगरात प्रवास करणार्‍या वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, काही वेळानंतर वाहतूक पोलिसांनी कोंडी दूर केल्याचे दिसून आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×